अचलपुरात सहायक फाैजदाराचा खून

One police officers murder in Achalpur
One police officers murder in Achalpur

अमरावती - अचलपूर येथे मंगळवारी (ता. ४) पहाटे एका सहायक फाैजदारावर लोखंडी रॉड व सळाखीने हल्ला चढवून त्यांचा खून करण्यात आला. या घटनेने हादरलेल्या पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतले.

शांतीलाल पटेल (वय ५२) असे मृताचे नाव आहे. सोमवारी (ता. ३) रात्रकालीन कर्तव्यावर असताना ते पहाटे ३ वाजताच्या सुमारास दुचाकीने जात होते. दरम्यान, सात ते आठ गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तत्पूर्वी फाैजदार शुभांगी ठाकरे या रात्री गस्तीवर असताना त्यांना सात ते आठ व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना आढळल्या. त्यांनी हटकताच काहींनी पळ काढला, तावडीत सापडलेल्यांना फाैजदार महिलेने खाक्या दाखविला.

या प्रकाराने अपमानित मद्यपींनी महिला फाैजदारास धडा शिकविण्यासाठी त्यांचा शोध घेतला. मात्र त्या दिसल्या नाहीत. दरम्यान या घटनेशी कुठलाही संबंध नसताना दुचाकीने निघालेले पोषाखधारी सहायक फाैजदार शांतीलाल पटेल त्यांना दिसताक्षणी त्यांच्यावर हल्ला चढविण्यात आला. पोलिस उपअधीक्षक शिरीष राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सदानंद मानकर व किरण वानखडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com