रेल्वेची कुर्ला (मुंबई) ते नागपूर एकेरी फेरी 

train
train

अमरावती : मध्यरेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला, मुंबई) ते नागपूर या मार्गावर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन एकेरी फेरी (वन वे ट्रीप) चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 

गाडी क्रमांक (02021-डाऊन) ही गाडी 12 नोव्हेंबरला मुंबईतील कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून दुपारी 4.40 मिनिटाला प्रस्थान करेल. ही सुपरफास्ट स्पेशल ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 6.40 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. 

कल्याण, इगतपुरी, नाशिक, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा व वर्धा अशा मोजक्‍याच महत्त्वाच्या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. या गाडीला थर्ड एसीचे दोन, स्लीपरचे 14 आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे 4 डबे जोडण्यात येतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com