एक होती अवनी.... शूटआउटला एक वर्ष पूर्ण 

सूरज पाटील 
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने जानेवारी 2018 ला टी-वन मिशन हाती घेतले होते. विविध प्रकारची रणनीती आखून वाघीण पथकाच्या हाती लागली नाही. त्यामुळे हे मिशन वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. जानेवारी महिन्यात वाघिणीला जेरबंद करण्यासाठी प्रथमच 200 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन टी-वन मिशन हाती घेण्यात आले. त्यावेळी देशपातळीवरील पाच अनुभवी शार्पशूटर, डबर बॅरल बंदूक, रात्रीच्या अंधारात वाघीण दिसेल, अशा प्रकारच्या नाइट दुर्बिणी, दोन स्निफर डॉग, ड्रोन कॅमेऱ्यांसह 60 ट्रॅप कॅमेरे, 20 म्हशी, 15 फूट उंच अशा 30पेक्षा जास्त मचाणी असा लवाजमा घेऊन मिशनला सुरुवात करण्यात आली.

यवतमाळ : राळेगाव तालुक्‍यातील वनक्षेत्रात मुक्त वावर करून तेरा जणांचे बळी घेणाऱ्या टी-वन अर्थात अवनी वाघीणीचे शूटआउट केले. या घटनेला शनिवारी (ता. 2) एक वर्ष पूर्ण झाला. अवनीला ठार केल्यानंतर शेतकरी, शेतमजुरांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. मात्र, अवनी नावाच्या एका भयाचा आता इतिहास बनला आहे. 

जंगल क्षेत्रात मुक्त वावर करून शेतकरी, शेतमजुरांच्या रक्ताचा घोट घेऊन अवनीने अनामिक भीती लोकांच्या मनात निर्माण केली होती. त्यामुळे तिचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाऊ लागली. वन्यप्रेमींनी वाघीणीला ठार मारण्याला कायम विरोधच केला. जानेवारी 2018 पासून सुरू झालेले टी-वन मिशन दोन नोव्हेंबरला अवनीच्या अंतानंतर फत्ते झाले. 

No photo description available.

वाघीण बोराटी वनपरिक्षेत्रातील वाघडोटा पुलाजवळ येताच तिच्या डोक्‍यावर शार्पशूटर असगर अलीने निशाणा साधला. भयग्रस्त जीवन जगणाऱ्या वीस गावातील नागरिकांनी मोकळा श्‍वास घेतला. मात्र, शार्पशूटर नवाब अली व त्यांचा मुलगा असगर अलीच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला. त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप करण्यात आले. मात्र, अवनीचा खात्मा झाल्यानंतर एकही बळी गेला नाही, हे विशेष. 

वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने जानेवारी 2018 ला टी-वन मिशन हाती घेतले होते. विविध प्रकारची रणनीती आखून वाघीण पथकाच्या हाती लागली नाही. त्यामुळे हे मिशन वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. जानेवारी महिन्यात वाघिणीला जेरबंद करण्यासाठी प्रथमच 200 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन टी-वन मिशन हाती घेण्यात आले. त्यावेळी देशपातळीवरील पाच अनुभवी शार्पशूटर, डबर बॅरल बंदूक, रात्रीच्या अंधारात वाघीण दिसेल, अशा प्रकारच्या नाइट दुर्बिणी, दोन स्निफर डॉग, ड्रोन कॅमेऱ्यांसह 60 ट्रॅप कॅमेरे, 20 म्हशी, 15 फूट उंच अशा 30पेक्षा जास्त मचाणी असा लवाजमा घेऊन मिशनला सुरुवात करण्यात आली. मात्र, अवघ्या काही दिवसांत हे मिशन गुंडाळण्यात आले. तोपर्यंत नऊ बळी गेले होते. 

पहिल्या टप्प्यानंतर पुन्हा चार बळी गेलेत. त्यामुळे एकूण बळीची संख्या 13 वर पोहोचली. जनतेतून संतापाची लाट उसळल्यामुळे शार्पशूटर नवाब शाफत अली खान यांना पाचारण करून पाच हत्तींना आणण्यात आले. अंतर्गत कलहात नवाब अली परत गेल्यानंतर एका हत्तीने महिलेचा बळी घेतला. त्यामुळे जनतेचा आक्रोश वाढला. वनविभागावर जनतेचा दबाव वाढत गेल्याने शार्पशूटरला पुन्हा पाचारण करण्यात आले. इटालियन श्‍वान, पॅरा ग्लॅडर आकाशात उडणारे यंत्रही आले. आठवडाभरात यंत्र बिघडले. श्‍वान परत गेले आणि टी-वन मिशनवर प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले. वनविभाग वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्‍त्या करण्यात येत होत्या. वाघिणीचे पगमार्ग जंगलक्षेत्रात नाही तर, शेतशिवारात आढळत असल्याने शेतकरी कमालीचे धास्तावले होते. 

वाघिणीचा काही ठावठिकाणा लागत नसल्याने परिसरात अमेरिकन परफ्यूम व नागपूर येथील महाराज बागेतील दुसऱ्या वाघिणीचे मूत्र शिंपडण्यात आले होते. त्यामुळे टी-वन वाघीण या भागात दुसऱ्या वाघिणीचा शोध घेत फिरत होती. ती वाघीण बोराटी वनपरिक्षेत्रातील वाघडोटा पुलाजवळ येताच तिच्या डोक्‍यावर निशाणा साधला गेला. याप्रमाणे अवनीचा अंत झाला. 

Image may contain: 2 people, people smiling
शार्पशूटर

ही गावे होती दहशतीत 
अवनीच्या दहशतीमुळे सराटी, बोराटी, सखी, लोणी, बंदर चिखलदरा, वरध, वेडशी, सावरखेडा, विहिरगाव, भूलगड, मोहदरी, खैरगाव, पिंपळशेंडा, अंजी, आठमुरडी, तेजणी, खेमकुंड, पळसकुंड, कृष्णापूर, घुबडहेटी, किनवट आदी गावे दहशतीत होती. 

अवनीला ठार मारल्यानंतर मी व असगर अलीच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला. आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. गोरगरीब जनतेचे प्राण वाचविण्यात यश मिळाल्याचे समाधान आहे. 
- नवाब शाफत अली खान, शार्पशूटर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one year completed to avani encounter