कांदा 60 तर, लसूण 250 रुपये किलो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर ः अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात कांदा, लसणाची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो 60 रुपयांवर पोहोचला असून तो 80 रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिवाळी सणात कांदा रडवणार आहे. लसणाचा दर प्रतिकिलो 250 रुपये झाला आहे.

नागपूर ः अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात कांदा, लसणाची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो 60 रुपयांवर पोहोचला असून तो 80 रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिवाळी सणात कांदा रडवणार आहे. लसणाचा दर प्रतिकिलो 250 रुपये झाला आहे.

राज्यात विदर्भासह सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने पिकांसह भाजीपाला उत्पादनाला फटका बसला आहे. कांदा, लसूण ही पिके जमिनीखाली असल्याने अतिवृष्टीने कुजली आहेत. उत्पादनही कमी आले आहे. ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी जादा पाऊस पडल्याने सप्टेंबर महिन्यात बाजारात दाखल होणारा कांदा यंदा एका महिना उशिरा येणार आहे. नागपुरातील बाजारपेठेत नाशिक, लासलगाव आणि मध्य प्रदेशातून कांदा येतो. पावसामुळे यंदा हा कांदा येण्यासाठी आणखी महिनाभर वाट पहावी लागणार आहे. साठवणुकीचा जुना कांदा होता तो पावसाच्या भीतीने विक्रीस काढण्यात येत आहे.
कळमना बाजारात सोमवारी कांदा आलेला आहे. या कांद्याचा दर प्रतिक्विंटल पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये प्रति टन दर मिळाला. त्यामुळे किरकोळ बाजारात हा दर 60 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या आठ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिकिलो 15 ते 20 रुपयांची दरवाढ झाली आहे.
कांद्याबरोबर लसूणही महाग झाला आहे. मध्य प्रदेशातून लसूण नागपुरात विक्रीस येतो. यंदा लसणाचे उत्पन्न कमी झाल्याने दर वाढले आहेत. प्रतिकिलो 200 ते 240 रुपये लसणाची विक्री होत आहे. कांदा, लसूण हे पदार्थ स्वयंपाक घरात फोडणीसाठी वापरत असल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.
अतिवृष्टीमुळे कांद्याला फटका बसला आहे. सध्या नाशिक येथून कांदा येत असली तरी आवक कमी आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. दसरा, दीपावलीपर्यंत दर चढे राहणार आहेत. नवीन कांदा आल्यानंतरच कांद्याचे दर उतरतील असे कांदा व्यापारी दत्तू बोरकर यांनी सांगितले.
कांदा आणि लसणाचा वापर खाद्यपदार्थात मोठ्या प्रमाणात होतो. मांसाहारी जेवणात हे तीनही पदार्थ वापरले जातात. सॅलड, रायता, दही कांद्यामध्ये कांद्याचा मोठा वापर होतो. चायनीज पदार्थामध्ये लसूण पेस्टचा वापर केला जातो. दरवाढीमुळे हॉटेल आणि चायनीज पदार्थ विक्री व्यावसायिकांना फटका बसत आहे, असे एका व्यावसायिकाने सांगितले.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion 60 while, garlic 250 kg