#OnionPrice : अरे... कुठे नेऊन ठेवला कांदा माझा? 

दिनकर गुल्हाने 
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणे, हा प्रकार तसा नेहमीचाच. परंतु, गेल्या आठवड्यात कांद्याच्या भावात भरमसाठ वाढ झाल्याने कांदा आता 120 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे कांद्याकडे बघितले तरीही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. 

पुसद (जि. यवतमाळ) : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर लवकरच सरकार स्थापन होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, जवळजवळ एक ते दी महिना काही सरकार स्थापन झाली नाही. त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय होता नवीन सरकार स्थापनेचा... सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतरही भाजप सत्तेपासून दूर राहिली तर महाशिवआडीने सत्ता स्थापन केली. यानंतर राजकीय चर्चेला जवजवळ विराम लागली. आता पुन्हा एक विषय चर्चेला जात आहे, तो म्हणजे कांदा... सततच्या भाव वाढीमुळे कांद्याने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 

No photo description available.

स्वयंपाक घरापासून ते लोकशाहीच्या मंदिरापर्यंत कांद्याला मोठा भाव आहे. दर घसरले की कांदा रस्त्यावर पसरतो अन्‌ कांद्याचे भाव वाढले की सभागृहात गाजतो. दोन्ही बाबतीत कांदा डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. कांद्याने सरकार गडगडल्याचे उदाहरण फार जुने नाही. कांदा हा स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक आहे. कांद्याशिवाय चवदार भाजी बनविणे अशक्‍यच आहे. कांदा दहा ते वीस रुपये किलोपर्यंत असल्यास त्याचे महत्त्व फारसे जाणवत नाही. मात्र, किंमत वाढल्यास तोच कांदा चांगलाच वांदा करतो, हे आता सर्वजण अनुभवत आहेत. 

हेही वाचा - कांद्याने केले वांदे

 

Image may contain: food

कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणे, हा प्रकार तसा नेहमीचाच. परंतु, गेल्या आठवड्यात कांद्याच्या भावात भरमसाठ वाढ झाल्याने कांदा आता 120 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे कांद्याकडे बघितले तरीही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. याचा सर्वाधिक त्रास गृहिणींना होत आहे. स्वाभावीकच कांद्याच्या वापरावर घरात आणीबाणी लागली आहे. बाजारात फेरफटका मारला असता ऐरवी विक्रीसाठी कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. मात्र, भाव वाढल्याने कांद्याचा ढीगही आकुंचन पावला आहे. 

बापरे! -  आला रे आला! बिबट्या अंबाझरीत, ड्रोनने शोधाशोध

विक्रेते व ग्राहक चिंतित

पुसद बाजारात दरआठवड्याला 450 कट्टे कांदा विक्रीसाठी येत होता. कांद्याने जशी शंभरी गाठली तशी कट्ट्याची संख्या शंभरवर घसरली. एकूणच कांद्याच्या वाढत्या भावामुळे विक्रेते व ग्राहक दोघेही चिंतित पडले आहेत. गिऱ्हाईक पांगल्याचे चित्र कांद्याची मनात सल उठवणारे दिसले. 

Image may contain: flower

भाजीचाही झाला वांदा

भाववाढीचा फटका हॉटेल चालकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. चविष्ट कांदेभजी कांद्याविनाच तयार होत आहेत. कांदा महागल्याने ताटातील कांदाच गायब झाला आहे. त्यातच कांदा काटकसरीने वापर करताना भाजीचा वांदा झाला आहे. कांदा महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सध्या लसूण व आलूचे ही भाव वाढल्याने रसोईघर संकटात सापडले आहे. 

सविस्तर वाचा - अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

 

अर्थमंत्र्यांवर टीकेची झोड

सध्या कांद्याचा प्रश्‍न गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. त्याचे पडसाद लोकसभेत उमटले नाही तर नवलच. कांद्याचे उत्पादन का घटले व त्याबद्दल काय उपाययोजना करण्यात आल्या, असा प्रश्‍न खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विचारला होता. "मी अशा कुटुंबातून आहे, जिथे जास्त कांदा व लसूण खाल्ले जात नाही' या अजब स्पष्टीकरणाने अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर नेटकरांनी टीकेची झोड उठवली आहे. हे उत्तर संवेदनशील नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. 

असे का घडले? -  दारांवर लागल्या पाट्या; "जनगणनेत आमचा सहभाग नाही' 

 

भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच

कांदा ही इंडियन फुडची "लाइफलाइन' आहे. या पार्श्‍वभूमीवर "ना खाऊंगी ना खाने दुंगी' ह नेटकऱ्यांची प्रतिक्रिया चांगलीच बोचरी आहे. एकूणच "कांदायण' गाजण्यास सुरुवात झाली आहे. या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच मिळत असल्याची टीकाही होत आहे. 

तुम्हीच सांगा करावे तरी काय? 
कांदा 120 रुपये किलोच्या वर गेल्याने मोठी अडचण होत आहे. भाजी कशी करावी असा प्रश्‍न पडतो. महिन्याला दिलेल्या पैशात काम भागवावे लागत आहे. जास्त कांदे विकत घेऊ शकत नाही. कमी कांद्याची भाजी कराव तर चव लागत नसल्याचे घरचे ओरडता. आता तुम्हीच सांगा करावे तरी काय? 
- दिव्या इंगळे,
गृहिणी, यवतमाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices rise