कांद्याची माळ घालून धनंजय मुंडे सभागृहात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

नागपूर - कांद्याला कमी भाव मिळत असल्याच्या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार जयवंतराव जाधव यांनी आज कांद्याची माळ गळ्यात घातली होती. मुंडे आणि जाधव यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला पणनमंत्री सुभाष देशमुख आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला. 

देशमुख आणि खोत यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने मुंडे, जाधव आक्रमक झाले. मंत्र्यांच्या उत्तरात शेतकऱ्यांच्या व्यथांचा उल्लेख नसल्याची टीका दोघांनी केली. मुंडे म्हणाले, की कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. 5 जुलैनंतर कांदा जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीत असल्याचे कोणतेही राजपत्र नाही, असेल तर ते सभागृहापुढे सादर करावे. केंद्र सरकारने कांद्याचा जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीत समावेश केला असल्याची खोटी माहिती लेखी उत्तरात देण्यात आली आहे. किमान निर्यातमूल्याच्या धरसोडीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 

देशाची 1 कोटी 30 लाख टन गरज असून, यंदा 2 कोटी 3 लाख टनांचे उत्पादन झाले आहे. म्हणजेच जवळपास 75 टक्के कांदा अधिक उत्पादित झाला आहे. त्यातील 13 लाख टन कांद्याची निर्यात झाली. नुकसान झालेला कांदा वगळता 15 ते 20 लाख टन कांद्याची निर्यात न झाल्याने भाव गडगडले आहेत.

केंद्रासह राज्याने उपाययोजना न केल्याने ही वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: onion string Dhananjay Munde Hall