घरबसल्या ऑनलाइन कमाई

मनीषा मोहोड
सोमवार, 28 मे 2018

नागपूर - बदलत्या काळात पैसा कमविण्याची पद्धतही बदलली आहे. इंटरनेटच्या क्रांतीमुळे सोशल मीडियावर विविध नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. केवळ बुद्धी आणि वेळ यांचा वापर करत इंटरनेटवरून लाखोंची उलाढाल करण्याची संधी आहे. या ‘वर्क फ्रॉम होम’ला महिलांची अधिक पसंती मिळत आहे.

नागपूर - बदलत्या काळात पैसा कमविण्याची पद्धतही बदलली आहे. इंटरनेटच्या क्रांतीमुळे सोशल मीडियावर विविध नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. केवळ बुद्धी आणि वेळ यांचा वापर करत इंटरनेटवरून लाखोंची उलाढाल करण्याची संधी आहे. या ‘वर्क फ्रॉम होम’ला महिलांची अधिक पसंती मिळत आहे.

सोशल मीडियावर जगभरात सुमारे २० लाख सेलर्स उपलब्ध आहेत. होममेकर्सचे ७० टक्के विक्रेते कपडे विकत आहेत. त्यापाठोपाठ सौंदर्यंप्रसाधने, फुटवेअर आणि किचनमधील सामानांची ऑनलाइन विक्री केली जात आहे. तसेच नियमित ब्लॉगलेखन करणाऱ्यांचे ब्लॉग हेरून ‘ गुगल ॲडसेन्स’तर्फे तेथे जाहिरातींच्या लिंक प्रदर्शित करण्यात येतात.

ब्लॉगला भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यास मोठ्या प्रमाणावर जाहिराती मिळण्यास सुरुवात होते. त्यातून संबंधित ब्लॉगरला घरबसल्या कमाई करण्याची संधी मिळते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुस्तके आणि जर्नलच्या भाषांतराचे काम, सॉफ्टवेअर अथवा एखाद्या अन्य उत्पादनाचा रिव्ह्यू लिहिणे, ऑनलाइन बुक रायटिंग, सर्वे, मार्केटिंग, पब्लिशिंग इत्यादी. 

ऑनलाइन फसवणूक 
‘ऑनलाइन वर्क’मध्ये फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून काही कंपन्या ऑनलाइन कामे करून घेतात. परंतु, मोबदला देत नाहीत. 

आम्ही ‘बॉस बाय रुचा डॉट कॉम’, ‘फ्लोर्र वॉक’ आणि ‘व्हॅल्यू क्रिएशन डॉट कॉम’ या कंपनीची ऑनलाइन कामे करतो. यात सर्वे, सेल्स आणि रिपोर्टिंगसारखी कामे घरबसल्या करता येतात. 
- बलदेवसिंग रावत, व्यवस्थापक, बॉस बाय रुचा डॉट कॉम.

इथे मिळेल जॉब 
Google Adsense 
Elance.com OR Zirtual.com 
Fiverr.com किंवा Upwork.com 
https://www.mturk.com
http://odesk.com 
http://scripted.com 
https://www.fiverr.com 
https://www.elance.com
MyprivateTutor.com
BharatTutors.com
tutorindia.net

Web Title: online income at home