अकरावीची ऑनलाइन नोंदणी जोमात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नागपूर - शालेय शिक्षण विभागाच्या वतीने अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दोन मे पासून अकरावीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असताना, तब्बल आठ दिवसांनी प्रशासनाकडून ऑनलाइन नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, अवघ्या सात दिवसांत साडेबारा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. आतापर्यंत 30 हजारांवर माहिती पुस्तिकांची विक्री करण्यात आली असल्याचे समजते. 

नागपूर - शालेय शिक्षण विभागाच्या वतीने अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दोन मे पासून अकरावीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असताना, तब्बल आठ दिवसांनी प्रशासनाकडून ऑनलाइन नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, अवघ्या सात दिवसांत साडेबारा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. आतापर्यंत 30 हजारांवर माहिती पुस्तिकांची विक्री करण्यात आली असल्याचे समजते. 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी परीक्षेचा निकाल लागण्याआधीच यंदा अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार दोन मे पासून पालकांना नोंदणी करण्यास सांगण्यात आले. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत अर्ज भरावयाचा आहे. पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांनी प्रवेश केंद्रावर माहिती पुस्तकांसाठी गर्दी केली. मार्गील दोन वर्षांआधी अकरावीमध्ये विज्ञान आणि द्विलक्षी शाखेचे प्रवेशच केंद्रीय पद्धतीने घेतले जात होते. त्यामुळे विज्ञान शाखेचे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शंभर तर बायोफोकलसाठी दीडशे रुपये वसूल करण्यात येत होते. गतवर्षीपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला ब्रेक देत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरात प्रत्येक महाविद्यालयात माहितीपुस्तिका वितरित केली जात आहे. तर सीबीएसई शाळेचे विद्यार्थी आणि अन्य बाहेरील विद्यार्थ्यांसाठी शहरात केंद्र उभारण्यात आले आहेत. या केंद्रांवर विद्यार्थ्यांना दीडशे रुपयात माहितीपुस्तिका विकण्यात येत आहे. त्यानुसार माहितीपुस्तिका खरेदी करताच, त्या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी करता येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, गत आठ दिवसांपासून संकेतस्थळ बंद असल्याने नोंदणी झाली नाही. मात्र, संकेतस्थळ सुरू होताच शाळांकडून नोंदणीला जोमाने सुरुवात झाल्यामुळे केवळ सात दिवसांत 12 हजार 500 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. गतवर्षी चाळीस हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

सीबीएसई, आयसीएसईसाठी निकालानंतर नोंदणी 
एकीकडे राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला टप्पा भरण्यासाठी निकालापूर्वी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सक्ती केली जात असताना, सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना निकाल घोषित झाल्यावरच दोन्ही टप्पे भरावे लागणार असल्याचे प्रवेश समितीकडून कळविण्यात आले. त्यानुसार आयसीएसईचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. त्यांच्यासाठी नोंदणी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.

Web Title: Online registration for eleventh