esakal | 2121 अंगणवाड्यांपैकी फक्त २०३ अंगणवाड्यांमध्ये नळाचे पाणी, विद्यार्थी हातपंपासह विहिरीच्या पाण्यावर भागवतात तहान
sakal

बोलून बातमी शोधा

only 203 anganwadi have tap connection in chandrapur

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे अंगणवाड्या चालविल्या जातात. जिल्ह्यात दोन हजार 121 अंगणवाड्यात आहेत. त्यातील 203 अंगणवाड्‌यात नळ जोडणी करण्यात आली आहे. उर्वरित अंगणवाड्यांत नळाची सुविधा नाही.

2121 अंगणवाड्यांपैकी फक्त २०३ अंगणवाड्यांमध्ये नळाचे पाणी, विद्यार्थी हातपंपासह विहिरीच्या पाण्यावर भागवतात तहान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाड्या चालविल्या जातात. दरवर्षी नवीन अंगणवाडी बांधकाम, जुन्याची दुरुस्ती, स्मार्ट अंगणवाड्या यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतात. मात्र, पाण्याची सुविधा करण्याकडे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. केवळ दहा टक्के अंगणवाड्यांत नळाच्या पाण्याची सुविधा आहे. अलीकडेच जल जीवन मिशनअंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून ही बाब समोर आली. 

हेही वाचा - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना...

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे अंगणवाड्या चालविल्या जातात. जिल्ह्यात दोन हजार 121 अंगणवाड्यात आहेत. त्यातील 203 अंगणवाड्‌यात नळ जोडणी करण्यात आली आहे. उर्वरित अंगणवाड्यांत नळाची सुविधा नाही. त्यामुळे हातपंप, विहिरीचे पाणी पिऊन अंगणवाडीतील बालके तहान भागवित असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचीही अशीच स्थिती आहे. जिल्ह्यात एक हजार 669 शाळा आहेत. त्यापैकी 803 शाळांतच नळाच्या पाण्याची सुविधा आहे. लहान मुलांचे प्राथमिक शिक्षण अंगणवाड्यातून होते. त्यामुळे अंगणवाड्या सोयीसुविधायुक्त असणे आवश्‍यक आहे. मात्र, अनेक अंगणवाड्यांत नळाची सुविधाच नाही. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यात जिल्हा परिषद, जीवन प्राधिकरण विभागाच्या नळ योजना आहेत. ग्रामपंचायतींच्याही स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. असे असतानाही अंगणवाड्यांत नळाच्या पाण्याची सुविधा करण्यात आली नाही. त्यामुळे हातपंप, विहिरीचे पाणी लहान बालकांना प्यावे लागत आहे. जिल्ह्यात एकूण 2121 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी केवळ 203 अंगणवाड्यांतच नळाची सुविधा आहे. चंद्रपूर तालुक्‍यात केवळ सहा ठिकाणच्या अंगणवाड्यांत नळाची सुविधा आहे.

हेही वाचा - कारमध्ये सापडले सहा पेट्या जिलेटिन; दोघांना अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

अंगणवाड्यातील बालकांना शुद्ध पाणी मिळणे आवश्‍यक आहे. मात्र, अनेक अंगणवाड्यांत ही सुविधा नाही. विजेचीही व्यवस्था नाही. अंगणवाड्या कोंडवाडे बनले आहे. नको त्या गोष्टीवर कोट्यवधी खर्च केले जातात.
-प्रा. रमेशचंद्र दहीवडे, अध्यक्ष, अंगणवाडी संघटना

loading image