"वैष्णवी'च्या बीएएमएस प्रवेशाचा मार्ग मोकळा

file photo
file photo

यवतमाळ : गेल्या वर्षी बीएएमएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी आर्थिक अडचण उभी ठाकली. मात्र, शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे यांनी शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने वैष्णवीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.
वैष्णवी संतोष जयस्वाल (रा. विलासनगर, वाघापूर) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. मूळचे दारव्हा तालुक्‍यातील धामणगाव (देव) येथील रहिवासी असलेल्या संतोष जयस्वाल यांनी मुलीच्या शिक्षणासाठी यवतमाळ गाठले. सुरुवातीला मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा ओढला. मुलगी वैष्णवी अभ्यासात हुशार असल्याने तिच्या शिक्षणात आर्थिक अडचणीमुळे खंड पडू नये, यासाठी कायम प्रयत्न राहिला. गेल्या काही वर्षांपासून रेमंड कंपनीत मजूर म्हणून काम करतात. मजुरीतून अत्यंत तोकडी रक्कम हाती येते. जयस्वाल दांपत्याने मुलीच्या शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. वैष्णवीला इयत्ता दहावीत 93.60 टक्के गुण मिळाले. तर, बारावी विज्ञान शाखेत 80 टक्के गुण होते. या काळात शिकवणीसाठी संतोष ढवळे यांनी मदत केली. डॉक्‍टर व्हायचे असल्याने नीट परीक्षा देण्यासाठी नांदेड गाठले. तिथेही आर्थिक मदतीतून समस्या निकाली निघाली. या परीक्षेत तिला 347 गुण मिळाले. अमरावती येथील डॉ. गोडे आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी प्रवेश घेतला. त्यासाठी वडिलांनी उसनवारी घेतली. आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले. आता द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी तारीख जवळ आली तरी पैसा जुळत नसल्याने वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सुटण्याची भीती वैष्णवीसह वडिलांना सतावू लागली आहे. दरम्यान, त्यांनी संतोष ढवळे यांची भेट घेतली. तत्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव करून एसबीआय बॅंकेतून साडेसहा लाखांचे शैक्षणिक कर्ज मंजूर करून घेतले. त्यामुळे आता प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असून, डॉक्‍टर होता येणार असल्याचा आनंद वैष्णवीच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
``कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी माझी कायम धडपड राहिली आहे. त्यातून अनेक डॉक्‍टर, अभियंता घडले आहेत. आताही शिकवणी अथवा शैक्षणिक मदतीसाठी विद्यार्थ्यांनी संपर्क केल्यास मदतीसाठी तयार आहे.``
-संतोष ढवळे
विधानसभा संपर्कप्रमुख, शिवसेना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com