'ऑपरेशन मुस्कान’ला अकोल्यात प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

अकोला : विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग यांनी हरवलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान २०१८’ ही मोहिम १ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात जिल्ह्यात बुधवारी (ता.५) सर्व विभागांची बैठक पार पडली. जिल्ह्यात या मोहिमेला गुरुवार (ता.६) सुरूवात होत आहे.

हरवलेली अल्पवयीन मुले, भीक मागणारी, कचरा गोळा करणारी, मंदिर, रुग्णालय परिसरात आढळून येणारी अल्पवयीन मुले शोधण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक अाणि महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या वतीने राज्यभरात ‘ऑपरेश मुस्कान’ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अमलबजावणीसाठी बुधवारी (ता.५) जिल्हा बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गायत्री बालीकाश्रम तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याचे २ कर्मचारी यांची बैठक स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पार पडली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलिस उप निरीक्षक छाया वाघ यांनी मार्गदर्शन केले. गुरुवार (ता.६) पासून या मोहिमेला सुरूवात केली जाणार आहे. अशा मुलाना शोधून त्यांना त्यांच्या अाई-वडिलांकडे सुपूर्द केले जाणार आहे.

या क्रमांकावर करा संपर्क
जिल्ह्यात हरविलेले, रस्त्यावर, मंदिर परिसरात किंवा रुग्णालय परिसरात कुठेही अल्पवयीन मुले आढळल्यास पोलिस विभागाच्या ०७२४-२४४५३०९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

४२ पोलिस कर्मचारी ऑपरेशनमध्ये सहभागी
‘ऑपरेशन मुस्कान’ला`जिल्ह्यात आजपासून सुरूवात होत आहे. या मोहिमेत ग्रामीण भागातील १३ आणि शहरातील ८ पोलिस ठाण्यातील प्रत्येकी २ असे एकूण ४२ कर्मचारी सहभागी होऊन हरवलेल्या आणि भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांचा शोध घेणार आहेत.

Web Title: operation muskan starts in akola