विदर्भातील तरुणांना सैन्यात जाण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

विदर्भातील तरुणांना सैन्यात जाण्याची संधी
नागपूर : विदर्भातील तरुणांना भारतीय सेनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नागपूर येथील सेना भरती मुख्यालयातर्फे 23 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान अमरावतीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे मेगा सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे. तरुणांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नागपूर मुख्यालयाचे भरती संचालक कर्नल आर. एम. नेगी यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

सात कॅटेगिरीतील पदांसाठी किमान 10 टप्प्यांमध्ये प्रक्रिया होणार आहे. बुलडाणा जिल्हा वगळता उर्वरित विदर्भातील तरुणांना सहभागी होता येईल. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून 24 ऑगस्ट ते 7 ऑक्‍टोबरदरम्यान www.joinindianarmy.inc.in या संकेतस्थळावर इच्छुक तरुणांना नोंदणी करता येईल. 12 दिवसीय भरती प्रक्रियेत प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवारांसाठी दिवस निश्‍चित केले जाणार असून ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यासंबंधीची विस्तृत माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. पत्रकार परिषदेला जनसंपर्क अधिकारी ग्रुप कॅप्टन बी. बी. पांडे उपस्थित होते.
उत्तेजक पदार्थांचे सेवन वर्ज्य
शारीरिक चाचणीदरम्यान क्षमता वाढविण्यासाठी उमेदवार उत्तेजक पदार्थांचे सेवन करतात. अशा पदार्थांच्या सेवनावर पूर्णत: बंदी असून भरतीपूर्वी उमेदवारांची तपासणी करण्यात येईल. प्रतिबंधित घटक आढळल्यास उमेदवारांना थेट घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे.
प्रक्रिया पारदर्शी
भरती प्रक्रिया पूर्णत: ऑनलाइन असून प्रत्येक टप्प्यावर आधारशी संलग्न बायोमेट्रिक पद्धतीने तपास होणार आहे. यामुळे कुणाचाही प्रक्रियेत हस्तक्षेप अशक्‍य आहे. यामुळे तरुणांनी दलालांपासून लांबच राहण्याचे आवाहन नेगी यांनी केले.

Web Title: The opportunity for youths of Vidarbha to go to the army