सरकारच्या खासगीकरण, निगमीकरणाचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

सोनेगाव डिफेन्स( जि.नागपूर )):  केंद्रातील विद्यमान सरकार भारतातील 41 आयुधनिर्माणी कारखान्यांचे खासगीकरण व निगमीकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे देशातील आयुधनिर्माणी कारखान्यात कार्यरत असंख्य कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, सोबतच देशाची सुरक्षा व्यवस्था संकटात येण्याची शक्‍यता आहे. अशी परिस्थिती भविष्यात उद्भवू नये याकरिता आयुधनिर्माणी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून(ता.22)संपूर्ण देशात चारदिवसीय आंदोलन सुरू केले. सोमवारी सायंकाळी आयुधनिर्माणी गेट क्र.3 समोर सर्व कामगार संघटनांनी एका सभेतून निषेध केला.

सोनेगाव डिफेन्स( जि.नागपूर )):  केंद्रातील विद्यमान सरकार भारतातील 41 आयुधनिर्माणी कारखान्यांचे खासगीकरण व निगमीकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे देशातील आयुधनिर्माणी कारखान्यात कार्यरत असंख्य कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, सोबतच देशाची सुरक्षा व्यवस्था संकटात येण्याची शक्‍यता आहे. अशी परिस्थिती भविष्यात उद्भवू नये याकरिता आयुधनिर्माणी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून(ता.22)संपूर्ण देशात चारदिवसीय आंदोलन सुरू केले. सोमवारी सायंकाळी आयुधनिर्माणी गेट क्र.3 समोर सर्व कामगार संघटनांनी एका सभेतून निषेध केला. निषेध सभेत ऑर्डनन्स फॅक्‍टरी एम्प्लॉईज फेडरेशन "लाल झेंडा'चे प्रतिनिधी गिरीश खाडे, भारतीय मजदूर संघाचे प्रतिनिधी ओ. पी. उपाध्याय, इंटक संघटनेचे प्रतिनिधी अरविंद सिंह, लोकशाही कामगार संघटनेचे प्रतिनिधी वेदप्रकाश यांनी कर्मचाऱ्यांची भूमिका मांडली. कामगारविरोधी व देशविघातक नीती रद्द व्हावी, याकरिता कर्मचाऱ्यांनी सरकारविरुद्ध लढा देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन संघटनांच्या प्रतिनिधींनी केले.  बी. बी. मुजुमदार, गिरीश खाडे, बंडू तिडके, विनोदकुमार, आशीष पाचघरे, आर. पी. चावरे, मुकुंद रंगदळे, प्रवीण महल्ले, सुभाष पडोळे, जगदीश गजभिये, वेदप्रकाश सिंह, अतुल चवरे, रोशन वैद्य, विनोद रामटेके, राकेश खाडे, अरविंद सिंह, दीपक गावंडे, यु. पी. सोनवाने, जे.पी.सिंग, संजय वानखेडे, सुनील मंडाले, सुदर्शन मेश्राम, गणेश मेश्राम, शीतल अंबाडे, भगत सकलानी, उमेश गोमासे, रोडीग्स, गणेश वासनिक आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposed to the privatization of government, corporate incorporation