बौद्ध परिषदेला विरोध योग्यच - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

नागपूर - धर्म आणि राजकारण वेगवेगळे आहेत. त्याची सरमिसळ करण्यास विरोध आहे. मात्र, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने असाच प्रयत्न करीत असल्याने आंतराष्ट्रीय शांती परिषदेला होत असलेला विरोध योग्यच आहे, असे सांगून भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोध करणाऱ्यांचे अभिनंदन केले.

रविभवन येथे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गोवा येथे सत्तास्थापनेचा वादावर न्यायालयाने जी मार्गदर्श तत्वे सांगितली होती त्याचे उल्लंखन कर्नाटकमध्ये राज्यपालांनी केल्याचा आरोप केला. याची तक्रार करण्याची गरज आहे. गोवा सत्ता स्थापनेच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने स्थिर सरकार देणाऱ्या आघाडीला प्रथम संधी देण्याचे निकष निश्‍चित केले होते. असे असताना कर्नाटकच्या राज्यपालांनी स्थिर सरकारऐवजी संख्याबळाच्या आधारावर सरकार स्थापनेसाठी भाजपला पाचारण केले. हा प्रकार न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणारा आहे. भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता न्यायालता तक्रार करावी, अशी सूचनाही प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

संविधान धोक्‍यात येण्याची भीती
देशात ‘करंट बॅलेंस पेमेंट’ची तूट आहे. शासनाकडे पैसा जमा नसून आर्थिक परिस्थिती खराब आहे. त्यामुळे जून, जुलै महिन्यात पाकिस्तानसोबत छेडछाड करून युद्धजन्य परिस्थिती निर्माण केल्यास आणिबाणी लागण्याची शक्‍यता आहे. यामुळे संविधान धोक्‍यात येण्याची भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Opposition to the Buddhist Conference - Prakash Ambedkar