दारांवर लागल्या पाट्या; "जनगणनेत आमचा सहभाग नाही' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

'जनगणनेत आमचा सहभाग नाही' या अभियानाला विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील ओबीसींकडून प्रतिसाद मिळत आहे. नागपूर, चंद्रपूर, राजुरा, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, अमरावती, औरंगाबाद, नांदेडसह अनेक भागांत विविध कार्यक्रमांच्या मदतीने ओबीसीच्या जनजागृतीचे कार्य सुरू आहे. 

नागपूर : ओबीसींच्या स्वतंत्र गणनेचा कॉलम नसल्याने प्रस्तावित जनगणना 2021ला ओबीसी बांधवांकडून विरोध दर्शविला जात आहे. "जनगणनेत आमचा सहभाग नाही', असा मजकूर असलेल्या पाट्या दारावर लावून विरोध अधोरेखित केला जात आहे. नागपूरच्या डॉ. अंजली साळवे यांनी जनगणनेला विरोध दर्शवित घरावर पाट्या लावण्याचे आवाहन केले होते. त्याला नागपूर, विदर्भासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून प्रतिसाद मिळत आहे. 

हेही वाचा - सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्‍लीनचिट 

डॉ. साळवे यांनी संविधानदिनी आपल्या घरी सर्वप्रथम पाटी लावत अशा पाट्या घरोघरी लावण्याचे आवाहन केले होते. त्याला विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील ओबीसींकडून प्रतिसाद मिळत आहे. नागपूर, चंद्रपूर, राजुरा, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, अमरावती, औरंगाबाद, नांदेडसह अनेक भागांत विविध कार्यक्रमांच्या मदतीने ओबीसीच्या जनजागृतीचे कार्य डॉ. साळवे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. 

Image may contain: 1 person
अनिल पारखी यांनी घरासमोर लावलेली पाटी 

दारावर पाटी लावण्यासोबतच ओबीसींच्या जनगणनेचा मुद्दा संसदेत उचलावा, यासाठी संघटनांनी राज्यातील खासदारांना निवेदन देण्याचेही आवाहन डॉ. साळवे यांनी केले होते. त्यानुसार खासदारांना विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींकडून निवेदन देण्याचाही क्रम सुरू झाला आहे.

Image may contain: 1 person, eyeglasses
यवतमाळ येथील राघवेंद्र कुचणकर यांनी घरासमोर लावलेली पाटी 

देशात ओबीसी आरक्षणावर आंदोलन सुरू असतानाच सरकारने 2021 जनगणनेचा कार्यक्रम जाहीर करीत प्रक्रियाही सुरू केली आहे. याविरोधात डॉ. साळवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ मध्यस्थी अर्ज दाखल करीत जनगणना 2021 ला आव्हान दिले आहे. 

Image may contain: 1 person, eyeglasses
नागपुरातील कल्पना मानकर यांनी घरासमोर लावलेली पाटी 

जनगणनेला स्थगिती द्या

भारतीय राज्य घटनेच्या कलम 340 व जनगणना कायद्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या बांधवांसोबतच मागासवर्गीय ओबीसी, व्हीजे, एनटी, डीएनटी व एसबीसी यांचीसुद्धा जनगणना अपेक्षित आहे. त्यानुसार या घटकांचा समावेश जनगणना 2021च्या नमुना अर्जात व्हावा, तोवर जनगणनेला स्थगिती द्यावी, अशी मागणी डॉ. साळवे यांनी केली आहे. 

अघडून तर बघा - पाडलं की हो! डॉन आंबेकरच्या चारमजली आलिशान बंगल्यावर बुलडोझर 

 

Image may contain: 1 person
डॉ. अंजली साळवे

घटकांचा केवळ वापर 
घटकांना केवळ व्होट बॅंक म्हणून वापरलं जात आहे. सर्वपक्षीय खासदारांनी ओबीसी जनगणनेचा मुद्दा संसद अधिवेशनात उपस्थित करावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ओबीसींसह व्हीजे, एनटी, डीएनटी, एसबीसीच्या संघटनांनीदेखील त्यांचे आंदोलन तीव्र करून आपापल्या क्षेत्रातील खासदारांना याबाबत निवेदन देऊन हा मुद्दा पुढे रेटावा. 
- डॉ. अंजली साळवे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition to OBC census