तोंडी तलाक देऊन पत्नीला केले बेघर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नागपूर : त्रिवार तलाकच्या विरोधात लोकसभेत नुकतेच विधेयक संमत झाले असतानाच तोंडी तलाक देऊन मुलाबाळांसह दोन महिलांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे या महिलांवर भीक मागण्याची वेळ ओढवली आहे. पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्या करीत आहेत.

निक्की शेख (वय 25) टेकानाका, खालसा रोड, कामठी व रुकसार खान (वय 22) टिपू सुलताननगर येथील दोघींना तोंडी तलाक देऊन पतीने टाकून दिले. निक्कीला तीन तर रुकसारला एक मुलगा आहे. दोघींनाही तलाक देण्यात आल्याचे सांगून त्यांच्या पतीने घराबाहेर काढले. शहरात कोणी नातेवाईक आसरा द्यायला तयार नाही, जवळ पैसे नाही आणि राहायला घर नसल्याने त्या उघड्यावर आल्या आहे. पोलिसांकडे जाऊन त्यांनी विनंती केली. मात्र, तुमचा आपसातील मामला आहे, यात आम्ही काही करू शकत नसल्याचे सांगून पोलिसांनी मदत करण्यास असमर्थता व्यक्त केली. निक्की व रुखसारने पतीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दोघींनीही भेटण्यास नकार दिला. त्यामुळे भीक मागून पोट भरण्याशिवाय दोन्ही महिलांसमोर पर्याय नाही. पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निक्की आणि रुखसार यांनी केली.

Web Title: Oral divorce news