esakal | विदर्भाच्या संत्र्याला लवकरच मिळणार राजाश्रय; फलोत्पादन मंत्री आदिती तटकरे यांनी दिले संकेत 
sakal

बोलून बातमी शोधा

orange Juice production will be donein viadarbh soon

राज्यात फलोत्पादन क्षेत्रात संत्रा लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. विदर्भात १ लाख ४० हजार हेक्‍टर क्षेत्र संत्रालागवडीखाली असून वरुड व मोर्शी तालुक्‍यात ४५ हेक्‍टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे

विदर्भाच्या संत्र्याला लवकरच मिळणार राजाश्रय; फलोत्पादन मंत्री आदिती तटकरे यांनी दिले संकेत 

sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

अमरावती ः विदर्भातील फलोत्पादन क्षेत्रातील सर्वांत मोठे क्षेत्र असलेल्या संत्र्याला राजाश्रय मिळण्याचे संकेत आहेत. संत्र्यावर प्रक्रिया व ज्यूसनिर्मिती प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला आहे. फलोत्पादन मंत्री आदिती तटकरे यांनी तसे संकेत दिले असून त्यादृष्टीने आमदार देवेंद्र भुयार यांच्यासोबत बैठक आयोजित करून चर्चाही केली आहे.

राज्यात फलोत्पादन क्षेत्रात संत्रा लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. विदर्भात १ लाख ४० हजार हेक्‍टर क्षेत्र संत्रालागवडीखाली असून वरुड व मोर्शी तालुक्‍यात ४५ हेक्‍टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे. मात्र, या भागात संत्र्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प नाही. त्यामुळे संत्राफळे व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही. 

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

व्यापारी देतील त्या भावात संत्रा विकावा लागतो. यामुळे संत्रा उत्पादकांची आर्थिक गळचेपी होत आहे. व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या भावावर संत्रा उत्पादकांना समाधान मानावे लागते.

या भागात संत्र्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला गेल्यास संत्रा उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शिवाय संत्र्याची वायनरी झाल्यास संत्र्याला भाव मिळू शकणार आहे. संत्राप्रक्रिया, ज्यूस व पल्प निर्मिती प्रकल्पासह वायनरी स्थापन करण्याचा प्रस्ताव आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्याच्या फलोत्पादन मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सादर केला. त्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली व प्रकल्प उभारण्यासाठी विस्तृत प्रस्ताव सादर करण्यास तसेच झटामझिरी येथील जागेची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

अधिक माहितीसाठी - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक

बैठकीला फलोत्पादन मंत्री आदिती तटकरे, आमदार देवेंद्र भुयार, कृषी आयुक्तालयाचे संचालक (फलोत्पादन) डॉ. के. पी. मोते, संचालक एन. टी. शिसोदे, कृषी व पदूम विभागाचे सहसचिव (फलोत्पादन) अशोक आत्राम, उद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल उगले, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग सुभाष नागरे, पणन विभागाचे कक्ष अधिकारी जयंत भोईर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळू कोहळे, माजी पं. स. सभापती नीलेश मगर्दे, रमेश जिचकार, नीलेश रोडे, संजय डफरे यांच्यासह नियोजित प्रकल्पाशी संबंधित शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top