भूमी अभिलेख कार्यालयात सामान्य नागरिकांची फरफट

Ordinary citizens are suffering at the Land Records Office
Ordinary citizens are suffering at the Land Records Office

तुमसर: भूमीअभिलेख विभाग अद्ययावत व डिजीटलायजेशनकडे वाटचाल करण्याच्या तयारीत असताना तुमसर येथील कार्यालयात मात्र मोजणी, फेरफारसह शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्याने सामान्य नागरिकांची फरपट सुरू आहे. भंडारा

येथील कर्मचाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत. अधिकारीसुद्धा नियमित येत नाहीत. याचा फटका नागरिकांना बसत असून रखडलेल्या प्रकरणांचा ताण वाढला आहे. या कार्यालयात अधिकारी नियमित उपस्थित राहत नसल्याने सर्वसामान्यांना मानसिक त्रास सोसावा लागत आहे. सदर कार्यालयात उपअधीक्षक भूमिअभिलेख एस. टी. खोडे हे तीन महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर आहेत. त्याठिकाणी प्रभारी गौरीशंकर खिची यांच्याकडे या कार्यालयाचा प्रभार आहे. ते आठवड्यातून एकदा बुधवार किंवा गुरुवारी येतात. तसेच या कार्यालयातील पदे रिक्त आहेत. दुरुस्ती लिपिक, निमंतनदार, अभिलेखापाल, परिवेक्षण भूमापन, छाननी लिपिक व शिपाई असे एकूण सात पदे रिक्त आहेत. भंडारा

शेती, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना भूमीअभिलेख कार्यालयाची महत्त्वाची भूमिका असते. सदर कार्यालयात जमीन मोजणी याशिवाय खरेदी-विक्री झालेल्या मालमत्तेचे फेरफार करण्यासाठी या कार्यालयात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व व्यावसायिकांना यावे लागते. नकाशा, उतारा, आखीव पत्रिका इत्यादी कागदपत्रे या कार्यालयातून मिळतात. मोजणीसाठी व इतर प्रकरणासाठी सर्वसामान्य लोकांकडून मोजणी शुल्क भरले जाते. तरीसुद्धा ती ठराविक कालावधीमध्ये पूर्ण होत नाही. या कार्यालयात नियमित अधिकारी नियुक्त करून होणारा त्रास थांबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. भंडारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com