गणेशोत्सवात करा अवयव दान

Organ donation in Ganesh festival
Organ donation in Ganesh festival

अकोला : दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे गणेशोत्सवादरम्यान संगीत कार्यक्रमासोबतच पर्यावरण पुरक गणेश उत्सव, अवयव दान, रक्तदान, नेत्रदानसारखे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गणेश मंडळांसह नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रा. विशाल कोरडे यांनी केले आहे. 

गणपती उत्सवादरम्यान दिव्यांग आर्ट गॅलरी नि:शुल्क संगीतमय कार्यक्रम 'दृष्टीगणेशा' या नावाने राबविणार आहे. प्रा. विशाल कोरडे रिसोर्स सेंटर फॉर इल्कुजिव्ह एज्युकेशन यांचा हा उपक्रम राहणार आहे. यामध्ये रक्तदान, नेत्रदान, अवयवदान या विषयावर जनजागृती तसेच पर्यावरण पुरक गणेश उत्सवांचे महत्व, कापडी पिशव्यांची जनजागृती, जलप्रदुषण कसे थांबविता येईल, निर्माल्य संकलन व विघटनाचे फायदे या विषयावर जनजागृती करण्यात येईल. तसेच दिव्यांग स्वयंरोजगारास व शैक्षणिक कार्यास सहकार्य मिळावे, यासाठीही हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

यासाठी आयुर्वेदीक महाविद्यालयाचे निवासी कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकुरारी शर्मा, शिवाजी महाविद्यालयाचे एनएसएस अधिकारी डॉ. संजय तिडके, डॉ. विद्या जयस्वाल, डॉ. राजेश बोडे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दिव्यांग ऑर्ट गॅलरीचे प्रा. विशाल कोरडे व अनुलोमचे गजानन भांबुरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com