महिलेचे यकृत पाठविले नागपूरला

प्रकाश गुळसुंदर
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

परतवाडा (अमरावती) : नर्सरी गावातील 65 वर्षीय कुसुमबाई यांचे यकृत दिल्लीतील एका व्यक्तीसाठी नागपूरला पाठविण्यात आले. त्यासाठी शहरात पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. तालुकास्तरावर राज्यात हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जाते.

परतवाडा (अमरावती) : नर्सरी गावातील 65 वर्षीय कुसुमबाई यांचे यकृत दिल्लीतील एका व्यक्तीसाठी नागपूरला पाठविण्यात आले. त्यासाठी शहरात पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. तालुकास्तरावर राज्यात हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जाते.
कुसुमताई अजाबराव इंगळे (वय 66) यांच्यावर स्थानिक भंसाली हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांचा मेंदू मृत (ब्रेनडेड) झाल्याची माहिती डॉ. भंसाली यांनी शुक्रवारी (ता.17) कुसुमबाईंचे नातेवाईक शंकर इंगळे, डॉ. निखिल इंगळे, पंकज इंगळे यांना देत अवयवदानाबद्दल समुदेशन केले. नातेवाइकांनी त्यासाठी होकार दर्शविला. डॉ. भंसाली यांनी नागपूर, मुंबई येथे संपर्क करून प्रादेशिक प्रत्यारोपण समितीला याबाबत माहिती दिली. दिल्ली येथील रुग्णाला विमानाने नागपूर येथील ऍलेक्‍सिस हॉस्पिटल येथे सकाळीच आणण्यात आले होते. तेथून अत्याधुनिक रुग्णवाहिका दुपारी परतवाडा येथे दाखल झाली. ऍलिक्‍स हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश जैन व शहरातील चिकित्सक डॉ. जाकिर, डॉ. शरद अडोनी, डॉ.सुरेंद्र बरडीया, डॉ. राजेंद्र भंसाली, डॉ. संदीप चौधरी, डॉ. सुरेश ठाकरे आदींनी या दरम्यान आपली उपस्थिती व आवश्‍यक सेवा दिली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महिलेचे यकृत परतवाड्याहून ग्रीन कॉरिडॉरने नागपूरला पोहोचवण्यात आले.
पुनर्जीवन फाउंडेशन एक वर्षापासून अवयदानाबाबत कार्यरत आहे. 500 पेक्षा अधिक लोकांनी यामध्ये अवयवदानाचा संकल्प केलेला आहे. परतवाडा शहरात मेंदू मृत झालेल्या व्यक्तींचे अवयव काढण्याचे केंद्र सुरू व्हावे, याकरिता प्रयत्न केले होते. डॉ. भंसालीच्या माध्यमातून ही सेवा प्रारंभ झाली, असे सांगितले जात आहे. पुनर्जीवन फाउंडेशनचे पदाधिकारी सुदर्शन काळे, विश्राम कुलकर्णी, जितेंद्र रोडे, राम तिवारी, राजा पिंजरकर, प्रमोद डेरे, ऍड. प्रशांत गाठे आदी शहरातील गणमान्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

Web Title: organ donation news

टॅग्स