आर्वीच्या उमेश अग्रवालांचे मरणोत्तर अवयवदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

अमरावती : आर्वी येथील उमेश अग्रवाल (वय 55) यांनी मरणोत्तर किडनी, लिव्हर अन्‌ डोळे दान करून या अवयवांची नितांत गरज असलेल्यांना जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य केले. जाता जाता अग्रवाल यांनी आपले अवयवदान करून इतरांना प्रेरणा दिली. यामध्ये त्यांचे बंधू महेश व मुलगा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

अमरावती : आर्वी येथील उमेश अग्रवाल (वय 55) यांनी मरणोत्तर किडनी, लिव्हर अन्‌ डोळे दान करून या अवयवांची नितांत गरज असलेल्यांना जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य केले. जाता जाता अग्रवाल यांनी आपले अवयवदान करून इतरांना प्रेरणा दिली. यामध्ये त्यांचे बंधू महेश व मुलगा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
चार डिसेंबरला रस्ता अपघात झाल्यानंतर त्यांना शहरातील रेडियन्ट सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अपघातानंतर दोन दिवसांतच त्यांचा ब्रेन डेड झाला. त्यांच्या कुटुंबीयांना हॉस्पिटल प्रशासनाने अवयवदान करण्याचा सल्ला दिला. रेडियन्ट हॉस्पिटलचे डॉ. सिकंदर अडवानी, डॉ. आनंद काकाणी व डॉ. पवन अग्रवाल यांनी अग्रवाल कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व सांगितले. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार अग्रवाल यांचे बंधू महेश अग्रवाल व त्यांचा मुलगा अवयवदानासाठी तयार झाले. दरम्यान, शुक्रवारी (ता. 7) सकाळी सात वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. तब्बल तीन तास शस्त्रक्रियेनंतर अग्रवाल यांची किडनी, लिव्हर अन्‌ डोळे काढण्यात आले. अवयवदानासाठी शहरात ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. किडनी नागपूर येथील व्होकार्ट हॉस्पिटल; तर लिव्हर हे न्यू ईरा हॉस्पिटल येथे ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पाठविण्यात आले. नेत्र हे शहरातील हरिना नेत्रदान समितीला दान करण्यात आले. नागपूर येथील डॉ. संजय कोलते, डॉ. राहुल सक्‍सेना व डॉ. प्रकाश खेतान यांनी ही शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ डॉ. मंगेश भोंगाडे, अमोल धंदर, हर्षल मोहिते व सारंग लकडे यांनी सहायक म्हणून काम पाहिले. अवयवदानाची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी चंद्रकुमार उपाख्य लप्पीभैय्या जाजोदिया, हरिना नेत्रदान समितीचे मनोज राठी, चंद्रकांत पोपेट, श्री. जाजोदिया तथा हरिना नेत्रदान समितीचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: organ donation news