अवयवदानातून चौघांना जीवनदान

मृत प्रकाश उमरे
मृत प्रकाश उमरे

नागपूर : उपचार घेत असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची मेंदूपेशी मृत पावत होते. कठीण प्रसंगात कुटुंबीयांनी एकमेकांचे धाडस बांधत अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यातून चौघांना नवजीवन मिळाले. नागपूर शहरातील हे 52वे मेंदूपेशी मृत अवयव प्रत्यारोपण ठरले. चालू वर्षात अवयवदानातून आतापर्यंत 19 जणांना प्राणदान मिळाले आहे.
प्रकाश उमरे (रा. सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स) हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होते. अचानक प्रकृती ढासळल्याने त्यांना मंगळवारी कोराडी मार्गावरील ऍलेक्‍सिस रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी त्यांच्या मेंदूपेशी मृत पावत असल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. लागलीच त्याबाबत कुटुंबीयांना कळवून अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात आले. दु:खाच्या प्रसंगातही काळजावर दगड ठेवत आई मीरा, पत्नी गायत्री व बहीण ज्योती उमरे यांनी अवयवदानास होकार कळविला.
कायदेशीर प्रक्रियेनंतर विभागीय प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, समन्वयक वीणा वाठोरे यांना माहिती देण्यात आली. समितीने प्रतीक्षा यादी तपासली असता मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात रुग्ण हृदयाच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट झाले. अवयवदानाबाबत माहिती कळविताच फोर्टिसची चमू तडकाफडकी नागपुरात दाखल झाली. स्थानिक यादीत ऍलेक्‍सिस रुग्णालयातच बेंगळुरू येथील 58 वर्षीय महिला यकृताच्या तर सावंगी येथे नांदेडचा तरुण आणि न्यू इरा रुग्णालयात दोन जण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असलेल्याचे आढळले.
हृदय व एक मूत्रपिंड बाहेरगावी पाठवायचे असल्याने पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना दोन टीम तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त जमिल अहमद, पोलिस निरीक्षक महेश चौहान, पोलिस उपनिरीक्षक वाघ यांनी ऍलेक्‍सिस हॉस्पिटल ते विमानतळ आणि ऍलेक्‍सिस हॉस्पिटल ते सावंगी असे दोन स्वतंत्र ग्रीन कॉरिडॉर तयार केले. यामुळे वेळेत अवयव पाठविणे शक्‍य झाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com