चंद्रपूर येथे राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

चंद्रपूर : जागतिक छायाचित्रदिनानिमित्त पॉवरसिटी फोटोग्राफर्स क्‍लब चंद्रपूरच्या वतीने तिसरी राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन 19, 20 व 21 ऑगस्टला येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाच्या लता मंगेशकर कला दालनात करण्यात आले आहे.
उद्‌घाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार नल्लामुथू राहतील. प्रोफेशनल आणि हौशी अशा दोन गटात स्पर्धा होईल. प्रोफेशनल गट स्पर्धेसाठी "वेडिंग', "नेचर' आणि "वाइल्ड लाइफ' हे विषय आहेत.

स्पर्धकांनी बारा बाय अठरा इंच आकाराचे, तर हौशी गटात आपल्या आवडीचे कोणतेही छायाचित्र आठ बाय बारा इंच आकारामध्ये सादर करणे बंधनकारक आहे. प्रत्येक गटात चार छायाचित्रे पाठविता येणार आहेत. प्रोफेशनल गटात प्रती छायाचित्र 300, तर हौशी गटाला दोनशे रुपये प्रती छायाचित्र शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रोफेशनल गटातील विजेत्याला अनुक्रमे अकरा हजार, सात हजार, पाच हजार, तर हौशी गटात अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी छायाचित्र प्रवेशिका श्री साई डिजिटल वर्ल्ड, भागवत आर्केड, सिव्हिल लाइन चंद्रपूर या पत्त्यावर किंवा या powercityphotographers@gmail.com संकेतस्थळावर 15 ऑगस्टपर्यंत पाठवाव्या, असे आवाहन केले आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organizing a State Level Photo Contest Exhibition at Chandrapur