लाॅकडाउनमुळे अडकलेले आहेत परप्रांतीय मजूर; मात्र पोलिसाने त्यांच्या सोबत केले असे अमानुष कृत्य

other state workers.jpg
other state workers.jpg

खामगाव (जि.बुलडाणा) : तालुक्यातील घाटपुरी येथील अनुसुचित मुलींच्या वस्तीगृहामध्ये 40 दिवसांपासून प्रशासकीय आश्रयाला असलेल्या परप्रांतीय मजूरांना शुक्रवारी रात्री दरम्यान शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या एका कर्मचारी पटट्याने अमानुषपणे मारहाण करुन गलीच्छ शिवीगाळ केली. आज सकाळी ही माहिती मजुरांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना दिल्यावर या गंभीर प्रकाराला वाचा फुटली. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

कोरोना संक्रमणानंतर लॉकडाऊनमध्ये अनेक मजूर अडकून पडले असून खामगाव येथील शासकीय वसतिगृहात या मजुरांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास येथे कार्यरत असलेल्या शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या एक ते दोन कर्मचाऱ्यांनी काही मजुरांना पट्याने बेदम मारहाण केली. ही बाब सकाळी त्यांना चहा देण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना मजुरांनी सांगितली, त्यानंतर माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांना वसतिगृहात जावून मजूरांना विचारपूस केली व घटनेची माहिती प्रशासनास दिली.

वरीष्ठ अधिकाऱ्यांनी केली चौकशी
अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक हेमराज राजपूत, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार डाॅ.शीतल रसाळ यांचेसह अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. मजुरांचे बयान घेण्यात आले असून वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करुन निलंबित करावे
औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे अपघातात 16 मजूर ठार झाले असल्याने पूर्ण देश दुःख व्यक्त करत आहे. घरदार सोडून मजूर अडकले असतानाच पोलिसांनी त्यांना केलेली अमानुष मारहाण निंदनीय आहे. लाॅकडाऊनमध्ये पोलिस विभागाने चांगले काम केले असताना काही पोलिस कर्मचारी असे असभ्य वर्तन करत असल्याने पोलिस विभागाची प्रतीमा मलीन होऊ नये म्हणून या प्रकरणीगुन्हा दाखल करुन निलंबित करावे.
-दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार खामगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com