मेंदूज्वराचा उद्रेक, 10 मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर ः दोन वर्षे उसंत दिल्यानंतर पूर्व विदर्भात पुन्हा जपानी मेंदूज्वराने डोकं वर काढलं आहे. सहा जिल्ह्यांमध्ये मागील सहा महिन्यांत 29 रुग्ण आढळले आहेत. यात पूर्व विदर्भातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष असे की, हे सारे रुग्ण अवघ्या दोन महिन्यांत आढळले असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. विशेष असे की, दरवर्षी पूर्व विदर्भात आढळणारा चंडीपुरा आता यवतमाळमध्ये पोहचला असून, एका चंडीपुरा मेंदूज्वराच्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार पुणे येथील मुख्य कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 14 तर गडचिरोली जिल्ह्यात जपानी मेंदूज्वरचे 7 रुग्ण आढळले आहेत. वर्ध्यात 4 तर गोंदियात एका रुग्णाची नोंद झाली. 29 पैकी उपचारादरम्यान 10 जपानी मेंदूज्वर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 40 टक्के मृत्यू जपानी मेंदूज्वरामुळे झाल्याची बाब उघडकीस येताच आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. सर्व मृत्यू हे चंद्रपूर आणि गोंदियातील आहेत. आढळून येणारे सर्व रुग्ण हे 15 वर्षांच्या आतील असल्यामुळे ही बाब अतिशय गंभीर असून येत्या 20 ऑगस्ट रोजी डेथ ऑडिट कमिटीची बैठक घेऊन हे मृत्यू नेमके कशाचे आहेत, याचे विश्‍लेषण करण्यात येईल. मेडिकलमध्येही जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष असे की, मेडिकलमध्येही मृत्यू होत आहेत. मात्र मेडिकलमध्ये होत असलेल्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागात केली जात नसल्याची जोरदार चर्चा येथे आहे.

चंडीपुरा यवतमाळात
चंडीपुरा मेंदूज्वर हा प्रामुख्याने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये आढळतो. विशेषतः नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोतील चंडीपुरा दिसून येतो. मात्र यावर्षी प्रथमच चंडीपुराने यवमाळात झेप घेतली आहे. यवतमाळमध्ये एका चंडीपुराच्या रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे चंडीपुरा आता पूर्ण विदर्भात डोके वर काढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outbreak of brain fever, 10 deaths