16 लाख ग्राहक महावितरणचे थकबाकीदार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

यवतमाळ : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 16 लाख 40 हजार थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे 262 कोटींची थकबाकी असून, ती वसूल करण्याचे आदेश परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालकांनी दिले आहेत.

यवतमाळ : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 16 लाख 40 हजार थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे 262 कोटींची थकबाकी असून, ती वसूल करण्याचे आदेश परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालकांनी दिले आहेत.

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकी वाढली आहे. ती करण्यासोबतच मागील आर्थिक वर्षातील थकबाकी वसूल करण्याचे फर्मान प्रादेशिक संचालकांनी दिले आहेत. थकबाकी भरण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेशही महावितरणने दिले आहेत. विदर्भातील अकराही जिल्ह्यांतील 16 लाख 40 हजार 97 वीजग्राहक थकबाकीदारांच्या यादीत गेले आहेत. त्यांच्याकडे वीजबिलाचे 262 कोटी 19 लाख रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. थकीत रक्कम न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. त्यासाठी अभियंत्यांपासून ते लाइन स्टॉपपर्यंत सर्वांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत.
जिल्हानिहाय थकीत रक्कम

अकोला-34 कोटी 10 लाख
बुलडाणा-33 कोटी 68 लाख
वाशीम-18 कोटी 16 लाख
अमरावती-41 कोटी 22 लाख
यवतमाळ-33 कोटी 79 लाख
चंद्रपूर-17 कोटी 43 लाख
गडचिरोली-10 कोटी
गोंदिया-10 कोटी 24 लाख
भंडारा-9 कोटी 63 लाख
वर्धा-14 कोटी 96 लाख
नागपूर ग्रामीण-20 कोटी 56 लाख
नागपूर शहर-18 कोटी 39 लाख

परिक्षेत्रांतर्गत वीजबिलापोटी थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. ग्राहकांनी त्यांच्याकडील थकबाकीचा भरणा करून कारवाई टाळावी.
-दिलीप घुगल, प्रभारी प्रादेशिक संचालक, नागपूर परिक्षेत्र.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The outstanding of 16 lakh consumer refinancing