पाणी फाऊंडेशनकडून गावकऱ्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

संग्रामपूर : स्पर्धा अजून संपली नाही कारण खारपान पट्ट्यातील  संग्रामपूर अजून जिकले नाही. असे प्रतिपादन निवासी जिल्हाउपाधिकारी ललीतकुमार वराडे यांनी आज (ता. 4) संग्रामपूर येथे आयोजित जलरत्नाचा सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले.

पाणी फाऊंडेशनच्या वतीने संग्रामपूर तालुक्यात स्पर्धेदरम्यान ज्या गावांनी पुढाकार घेऊन जलक्रांतीसाठी श्रमदानातून जलसाठा निर्मितीचे कार्य केले. अशा गावातील जलयोध्ये आणि जलरागिनी याचा प्रमाणपत्र आणि झाड देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी जिल्हाउपाधिकारी वराडे हे होते.

मंचकावर तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर, नायब तहसीलदार समाधान राठोड, पाणी फाऊंडेशन चे जिल्हा समनवयक नरेंद्र काकड याची उपस्थिती होती. प्रास्तविक मध्ये काकड यांनी स्पर्धे दरम्यान नागरिकांची जिद्द आणि मेहनत महत्वाची ठरली. तर कृषी अधिकारी सवडतकर यांनी पुढील वर्षी कामाचे असे नियोजन करू की राज्य या तालुक्याचा आदर्श घेईल. पाण्याची गंभीर समस्यां निकाली काढण्या साठी जसा सामूहिक लढा आपण उभा केला. त्याच धर्तीवर चालू हंगामात गुलाबी बोडं अळी निर्मूलन साठी सामूहिक लढा उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक उपाय योजना करून कृषी विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी या कार्यक्रमातून केले.

पाणी फाऊंडेशनचे तालुका समनवयक प्रताप मारोडे यांनी स्पर्धे दरम्यान  तालुक्यात सोळाशे बावीस शोषखड्डे, पन्नास हजार नऊशे चवसष्ट घनमीटर श्रमदान आणि पाच लाख घनमीटर यंत्रा चे सहाय्याने जलस्त्रोत साठी कामकाज झाल्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात वराडे यानी  संग्रामपूर तालुक्यात कठीण परिस्थिती सोबत संघर्ष करीत जीवन जगावे लागते. या तालुक्याला खारपान पट्टयाचा कलंक पुसण्यासाठी आगामी काळात प्रत्येक नागरिक पेटून कामाला लागला पाहिजे. त्यासाठी जिल्हा प्रशासन मदत करेल. असे आश्वासन ही दिले  कार्यक्रमाचे संचलन विवेक वानखडे, आणि आभार सीमा उमाळे यांनी व्यक्त केले.

या गावाचा झाला सन्मान...
पाणी फाऊंडेशन मध्ये स्वपुढाकारातून पाणी साठण्यासाठी कामगिरी करणाऱ्या गावकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्या मध्ये निमखेड, कोलद, तामगाव, सालवन, पातूरडा खुर्द, दुर्गादैत्य, हिंगणा ,काकोडा, जस्तगाव, खळद, वडगाव वाण, एकलारा, वकाना, मारोड, धामनगाव, शेवगा, शेतखेडा, सावळा, निवाणा, रुधाना, चागेफळ खुर्द, वानखेड आदी गावाचा समावेश आहे. 

विविध संस्था चा ही सत्कार
ज्या संस्थानी या लोकचळवळसाठी सहकार्य केले अशा, लायन्सक्लब, तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना, तालुका शिक्षक प्राथमिक पतसंस्था, संत तुकाराम नागरी पतसंस्था जळगाव जा., बुलढाणा अर्बन, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ भोसरी,विजवीतरण कंपनी,ग्रीन आणि क्लीन पातूरडा ग्रुप,कृषी सहाययक व मंडळ अधिकारी संघटना, वनविभाग, सन्मान ग्रुप जळगाव यांचा समावेश होता. या सोबतच भारतीय जैन संघटनेचे संग्रामपूर तालुका समनवयक विष्णू गव्हाळे, हेमंत भन्साली, चिखलीचे राहुल सपकाळ, नांदुरा चे आशिष वानखडे, जळगावचे परेश भन्साली, सह प्रमोद लोढा , सचिन अग्रवाल, आदी व्यक्तीचा सत्कार करण्यात आला.

Web Title: paani foundation felicitate sangrampur villagers