"बॅक वॉटर'ने धानपीक धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

भंडारा : सिंगोरी येथील तुडुंब भरलेल्या तलावातील बॅक वॉटरमुळे तलावाच्या वरील भागात असलेल्या शेतकऱ्यांची 40 एकर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतातील धानरोपे सडण्याची शक्‍यता असून प्रभावित शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागणार आहे.
साठवण क्षमतेएवढे पाणी तलावात ठेवून अतिरिक्त पाणी त्वरित सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.

भंडारा तालुक्‍यातील मौजा चांदोरी येथे गटक्रमांक 394 मध्ये 4.76 हेक्‍टर आर. क्षेत्रामध्ये सरकारी तलाव आहे. याच तलावात मत्स्यपालनसुद्धा केले जाते. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हा तलाव तुडुंब भरला आहे. तलावातील पाण्याचा विसर्ग बंद असल्याने अतिरिक्त पाणी तलावाच्या वर असलेल्या शेतीत शिरत आहे. आज या "बॅक वॉटर'मुळे गट क्र. 238, 246, 245, 236, 243, 244, 242, 398, 306 मधील 40 एकर शेती तलावाच्या पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तलावातील अतिरिक्त पाणी सोडून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे केली आहे. मात्र, तलावाच्या खालील बाजूला असलेल्या शेतकऱ्यांचा तलावातील अतिरिक्त पाणी सोडण्यास विरोध आहे. यावरून अनेकदा शेतकऱ्यांत भांडणे झाली असून प्रकरण पोलिसांत गेले आहे. या प्रकरणी चौकशी करून न्याय देण्याची मागणी जीवनदास आत्राम, अनिल निंबार्ते, रघुनाथ भुरे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: paddy crop news