
आज रात्री घोषित करणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये कांबळे यांच्यासमवेत महाराष्ट्रातील सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, जसवंतीबेन पोपट, परशुराम गंगावणे व उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांचाही समावेश आहे.
नागपूर : 'राघववेळ' आणि त्यानंतरच्या लिखाणात गावकुसाबाहेरील स्त्रियांची वेदना मांडणारे विदर्भातील नामवंत लेखक, कादंबरीकार नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. आज रात्री घोषित करणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये कांबळे यांच्यासमवेत महाराष्ट्रातील सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, जसवंतीबेन पोपट, परशुराम गंगावणे व उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांचाही समावेश आहे.
हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
हा साहित्यसेवाचा सन्मान -
मला जाहीर झालेला पद्मश्री सन्मान हा आतापर्यंत केलेल्या साहित्यसेवेचा सन्मान होय. राघववेळ, ऊनसावली आणि सांजरंग या तिन्ही कादंबऱ्यांमधून गावकुसाबाहेरील स्त्रिची वेदना मांडली. स्त्रीप्रधान साहित्यात मुख्यत्वे दलित साहित्यात हा प्रयोग नवीन होता. तत्कालीन गांधी-आंबेडकरी साहित्यात जो संघर्ष होता तो मी समेटाच्या पातळीवर रेखाटण्याचा प्रयत्न केला. आजवर स्पर्श न झालेल्या अनेक विषयांवर लेखन केले. पद्मश्री पुरस्कार हा त्याची पावती आहे असे मी मानतो.
- नामदेव चं. कांबळे, वाशीम.