पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व द्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

अकोला - पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

अकोला - पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने अंमलबजावणी सुरू केली आहे. याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्राने सर्व राज्यांना दिले आहेत. महाराष्ट्र राज्य वगळता गुजरात, छतीसगड, मध्य प्रदेश या राज्यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे, याकडे शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: pakistan india hindu indian Citizenship devendra fadnavis