शेगाव च्या 'श्रीं'ची पालखी पंढरपूरकडे रवाना

संजय सोनोने
मंगळवार, 19 जून 2018

शेगाव (जि.बुलडाणा) : संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी पायदळ दिंडी १९ जून रोजी सकाळी  ७ वाजता वाजता टाळकरी, पताकाधारी, अश्व, गजा सह पंढरपूरकडे मार्गस्त झाली. या पायदळ दिंडीतील पालखीत श्रींचा रजत मुखवटा होता.  राजवैभवी थाटात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या नयनरम्य सोहळ्यात टाळकरी पताकाधारी सहभागी आहेत. पायदळ वारीचा प्रवास हा मागील ५० वर्षांपासून अविरत सुरू आहे. हे पायदळ वारी चे ५१ वे वर्ष आहे. 

पंढरीच्या विठोबाच्या भेटीची आस ठेवत आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव यायेथील संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी उत्साहात पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली.

शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानचा यंदा ५१ वा पालखी सोहळा आहे. व्यवस्थापकीय संचालक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते विधिवत ‘श्रीं’चा रजत मुखवटा फुलांनी सजविलेल्या पालखीत स्थापन करण्यात आला. यावेळी गण गणात बोतेच्या गजरात भाविकांनी जयघोष केला. महाआरतीनंतर पालखीने मंदिर परिसरातून पंढरपूरसाठी प्रस्थान केले. त्यानंतर पालखी ‘श्रीं’च्या प्रगटस्थानी गेली. तेथून श्रीक्षेत्र नागझरीमार्गे अकोलाकडे रवाना झाली. पालखीसह अश्व, गज, पताकाधारी, टाळकरी असे ५०० च्यावर वारकरी सहभागी झाले आहेत.

त्यांच्या सेवेसाठी संस्थानचे सेवेकरीसुद्धा पालखीसोबत आहेत. आरोग्य सुविधेसाठी डॉक्टर आणि औषधोपचाराने सज्ज रुग्णवाहिका तैनात आहे.  

गजानन महाराजांच्या पालखीला निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी शेगावच्या सीमेपर्यंत पालखीलासोबत केली. तब्बल एक महिन्याच्या पायदळ वारीनंतर१८ जुलै रोजी श्रींची पालखी पंढरपूरला पोहचणार आहे. या ठिकाणी २५  जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम राहणार असून त्यानंतर पुन्हा 7 ऑगस्ट रोजी शेगावसाठी परतीचा प्रवास सुरू होईल.

Web Title: Palkhi of 'Shree Gajanan Maharaj' of Shegaon leaves for Pandharpur