पणन महासंघावर कॉंग्रेसचा ताबा

file photo
file photo

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक महासंघाची (पणन) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या या महासंघावर पहिल्यांदाच कॉंग्रेसचे अध्यक्ष व उपाध्यक्ष झाले आहेत.
पणन महासंघाचे अध्यक्षपद डॉ. एन. पी. हिराणी यांच्या रूपाने सलग 15 वर्षे यवतमाळ जिल्ह्याकडे होते. यापूर्वी प्रशासक तसेच पणन महासंघाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच होते. गतवर्षी उषा शिंदे यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. आघाडीत ठरल्याप्रमाणे एक-एक वर्ष अध्यक्ष व उपाध्यक्ष बदलायचे होते. त्यामुळे उषा शिंदे (येवला), प्रसन्नजित पाटील (खामगाव) यांनी पदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (ता. 21) निवडणूक झाली. गेल्या वेळी अपक्ष सुरेश चिंचोळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे कायम राहिले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वी त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. परिणामी, संख्याबळ बदलले. पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे आठ-आठ सदस्य होते. तर सुरेश चिंचोळकर अपक्ष म्हणून विजयी झाले. गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीचा अध्यक्ष, तर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झाले. यावेळी समीकरण बदलले सुरेश चिंचोळकर यांचा अधिकृत कॉंग्रेस प्रवेश झाल्याने कॉंग्रेसची संख्या नऊ झाली. राष्ट्रवादीकडे आठ सदस्य राहिले. संख्याबळ बदलल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अनंत देशमुख (अमरावती), उपाध्यक्षपदी ऍड. विष्णुपंत सोळंके (परभणी) दोघे विजयी झाले.
चिंचोळकरांचे वजन कॉंग्रेसच्या पारड्यात
गेल्या वेळी सुरेश चिंचोळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीची संख्या नऊ झाली होती. यावेळी सुरेश चिंचोळकर यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासोबत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विजय वेडट्टीवार व आमदार यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने पणन महासंघ कॉंग्रेसच्या ताब्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com