पैनगंगा अभयारण्यात पट्टेदार वाघाचा वावर?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

ढाणकी (जि. यवतमाळ) : पैनगंगा अभयारण्यात पट्टेदार वाघाचा वावर असल्याचे बोलले जात होते. परंतु, कोणाच्याच नजरेत वाघ पडला नव्हता. आता मात्र, तो कॅमेऱ्यात कैद झाला. बिटरगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत असलेल्या जंगलातील आकोली कक्ष क्रमांक 488मध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅंमेऱ्यात हा रुबाबदार पट्टेदार वाघ कैद झाला आहे.

पैनगंगा अभयारण्य घनदाट जंगलाने व्यापलेले आहे. पैनगंगा नदी अभयारण्यातून वाहत असल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी मूबलक पाणी मिळते. त्यामुळे अनेक पक्षी, प्राणी या भागात वास्तव्यास आहेत. बिबट, अस्वल, रोही, कोल्हे, हरीण, रानडुकरे, लांडगे, रान गायी या परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरेस पडतात. शिकारीच्या शोधात बाहेर निघालेला पट्टेदार वाघ कॅंमेऱ्यात कैद झाला. बिटरगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी ए. एच. गोरे यांनी वाघाचे पगमार्क (पाऊल खुणा) पाहून मसलगा जंगलातील आकोली कक्षात सहा ट्रप कॅंमेरे लावण्यात आले होते. त्यातील 488 वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघ कॅंमेऱ्यात कैद झाला. पैनगंगा अभयारण्यात या वर्षी पहिल्यांदाच ट्रेकिंग स्पॉटवर कॅंमेरे काही दिवसांपूर्वी लावण्यात आले. 488 क्षेत्रांतील कैद झालेला रुबाबदार पट्टेदार वाघाची पूर्ण वाढ झाली असून, त्याची डौलदार शरीरयष्टी असल्याची माहिती वनअधिकारी गोरे यांनी दिली. एकूण पगमार्क वरून मादी वाघीण व काही पिल्ले (छावा) असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तेही ट्रप कॅंमेऱ्यात कैद होतील, अशी आशा वनविभाकडून व्यक्त केली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Panganga Sanctuary Striped tiger