बुलडाणा: महाराष्ट्र् दिनी शेकडो हात लागले श्रमदानाला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

संग्रामपूर (बुलडाणा) खारपान पट्ट्यात पाण्यासाठी महाराष्ट्र् दिनादिवशी सकाळी शेकडो हात लागले श्रमदानाला लागले. संग्रामपूर तालुक्यातील काकोडा या खारपान पट्ट्यातील गावात महाराष्ट्र दिनाचे सकाळी महा श्रमदान उपक्रमामध्ये राज्यभरातील विविध संघटनांचे हात खोदकामासाठी सरसावले.

जवळपास सकाळपासून तीनशे नागरिक सलग सम पातळी चर खोदाई करीत आहेत. या मध्ये काकोडा येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी असून पंचायत समिती कर्मचारी पदाधिकारी, भारतीय जैन संघटनेचे कर्मचारी, लायन्स क्लबचे सदस्य, मुंबई वरून आलेले निर्माणचे काही डॉक्टर सदस्य, वैदयकीय टीम, तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आदी जण या चळवळीसाठी काकोडा गावात घाम गाळत आहेत. ऐकीचे बळ मिळेल फळ असे वातावरण वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यात दिसत आहे. श्रमदानातून कोणतेही काम शक्य होऊ शकते  

याची नागरिकांमध्ये जाणीव आणि जागृती होण्याच्या दृष्टीने बाहेरील लोकांचा सहभाग गावकर्यासाठी प्रोत्साहन ठरणारा आहे. काकोडा येथे मुंबईवरून आलेली टीम पाहून गावकऱ्यांचा जोश वाढला आहे. या नंतर पुणेची पन्नास लोकांची टीम याच तालुक्यातील एकलारा बानोदा गावासाठी एक दिवस श्रमदानासाठी येणार असल्याची माहिती तेथील पाणी फाऊंडेशन कडून मिळाली. सोबतच मशीनसाठी पुणे येथील एका दात्याने एक हजार लिटर डिझेलचे दान एकलारा गावासाठी दिले आहे.

Web Title: pani foundation work in sangrampur buldhana