बिबट्याची दहशत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

धामणगाव रेल्वे (अमरावती) ः तालुक्‍यातील ढाकुलगाव येथील एका शेतातील गोठ्यातील वासराची बिबट्याने शिकार केल्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतीची कामे खोळंबली आहे. याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. वनविभागाने लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. याचा परिणाम शेतकामावर झाला आहे. तालुक्‍यातील ढाकुलगाव येथील प्रल्हाद पुंडलिक भिसे यांच्या वासराची बिबट्याने रविवारी शिकार केली. बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने शेतात जाणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक अजूनही शेतात आहे. दरम्यान, वनविभागातर्फे घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला आहे. त्याठिकाणी टॅप कॅमेरा लावण्यात आला होता हे विशेष. या परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा मिळाल्या असून वनविभागातर्फे शोधकार्य सुरू आहे. 

बिबट्याच्या पाऊलखुणा 
ज्या ठिकाणी वासराची शिकार झाली त्या परिसरात बिबट्याच्या प्रथमदर्शी पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. कॅमेराच्या तपासणीनंतर बिबटच आहे काय स्पष्ट होईल, असे चांदूर रेल्वेचे परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेम तिडके यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panic terror