रस्त्यावर सापडले स्त्री जातीचे मृत अर्भक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. राळेगाव यवतमाळ रस्त्याला लागून राणा जिनींगसमोर मातीत 1 स्त्री जातीचे मृत अभर्क जमिनीत गाडल्याचे आढळले.

यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. राळेगाव यवतमाळ रस्त्याला लागून राणा जिनींगसमोर मातीत 1 स्त्री जातीचे मृत अभर्क जमिनीत गाडल्याचे आढळले. याची सूचना एका सजग नागरिकाने पोलिसांना दिली.    

पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शाम सोनटके व कर्मचारी तिथे घटनास्थळावर पोहोचले. ते अभर्क ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करीत पाठवण्यात आले. स्त्री जातीचे अर्भक हे तीन ते चार दिवसाचे असल्याचे समजते. अवैध संबंधातून हे कृत्य केले की मुलगा हवा आहे आणि मुलगी झाली म्हणून फेकण्यात आले असे असल्याचा कयास बांधला जातोय. माता नव्हे तू वैरिणी असे म्हणायची वेळ आली आहे. पुढील तपास राळेगाव पोलीस करीत  आहे.   

Web Title: Parents committed female infanticide on road at Yawatmal