सुरेश भट सभागृहात लागणार पार्किंग शुल्क

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नागपूर - आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेने शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात परिसरात वाहन पार्किंगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहेच, शिवाय येथे येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांच्या सुरक्षेची हमीही मिळणार असल्याचे सूत्राने नमूद केले. 

महापालिकेने मध्य नागपूर परिसरातील रसिकांसाठी सुरेश भट सभागृह बांधले. सर्व सोयीसुविधा असलेल्या या सभागृहात येणार प्रेक्षक येथील सुविधांनी थक्क होतो. दररोज होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येथे येतात. सध्या त्यांच्याकडून कुठलेही वाहन पार्किंग शुल्क घेतले जात नाही. दुसरीकडे शहरातील काही सभागृहात पार्किंग शुल्क आकारल्या जाते. या धर्तीवर पार्किंग शुल्क न वसूल केल्यामुळे महापालिकेचे वर्षाला कोट्यवधीचे नुकसान होत आहे.

हे नुकसान भरून काढणे तसेच प्रेक्षकांना त्यांच्या वाहनांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी पार्किंग शुल्क घेण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या वाहतूक विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव १० मे रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. दर निश्‍चत केल्यानंतर पार्किंगसाठी निविदा काढण्यात येणार आहे.

प्रस्तावित पार्किंग शुल्क प्रति कार्यक्रम 
सायकल    ५ रुपये 
दुचाकी    १० रुपये 
चारचाकी वाहने    २० रुपये

Web Title: parking fee in suresh bhat hall