चंद्रपुरात आता पासपोर्ट सेवा केंद्र 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

चंद्रपूर - केंद्रीय विदेश मंत्रालयाने डाक विभागाच्या माध्यमातून चंद्रपुरात भारतीय पारपत्राकरिता (इंडियन पासपोर्ट) सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. 

जिल्ह्यातील नागरिकांना भारतीय पारपत्राकरिता नागपूर येथे आवेदन करावे लागत होते. प्रक्रियेस विलंब लागत असल्याने वारंवार नागपूरला जावे लागत होते. यात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे चंद्रपूर येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय दूरसंचार मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनोज सिन्हा यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर विदेशमंत्र्यांनी डाक विभागाच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. चंद्रपूर येथील डाक विभागाच्या माध्यमातून तिसऱ्या टप्प्यात पासपोर्ट सेवा उपलब्ध होणार आहे. चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना या सेवेचा लाभ होणार आहे. 

Web Title: Passport service center at Chandrapur now