सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पातुर्डा फाटा (जि. बुलढाणा) - सततची नापिकीमुळे लहान भावाच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा खर्च कसा भागवावा या विवंचनेत गुरुवारी दुपारी पातुर्डा खुर्द (ता. संग्रामपूर) येथील हुल जनार्दन म्हसाल (वय 25) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

राहुलचे आई-वडील शेतात गेले होते. शेतातील कामे पूर्ण झाल्यावर परतलेल्या आईने घराचा दरवाजा उघडून पाहिला असता राहुल यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे मूग व सोयाबीनचे पीक हातातून गेले होते. त्यातच लहान भावाच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, या विवंचनेत राहुल असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली आहे.

Web Title: paturda phata buldhana news farmer suicide