मानसिक त्रासाला कंटाळून केला खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नागपूर - जावई कमलाकर पवनकर याने बहिणीकरवी त्रास दिला. तसेच मुलांचाही ताबा देण्यास नकार देत होता. आर्थिक कोंडी केल्यामुळे जगणे मुश्‍कील करून ठेवले होते. त्यामुळेच मानसिक त्रासाला कंटाळून कमलाकरचा खून करण्याचे ठरविले. मात्र, त्याच्या कर्माचे फळ संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागले, असा खळबळजनक खुलासा पवनकर हत्याकांडाचा आरोपी विवेक पालटकर याने पोलिसांकडे केला आहे.

११ जूनला विवेक पालटकरने बहीण अर्चना, जावई कमलाकर, सासू मीराबाई, भाची वेदांती आणि मुलगा कृष्णा याचा सब्बलीने वार करून खून केला. त्यानंतर तो पंजाबला पळून गेला. गुन्हे शाखेने त्याला लुधियानातून पकडून आणले.

त्याला न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. नंदनवन पोलिसांनी आज रविवारी दिवसभर चौकशी केली. हत्याकांडाबाबत विचारणा केल्यानंतर त्याला अजिबात पश्‍चात्ताप झाला नसल्याचे विवेक म्हणतो.

‘इमोशनल ब्लॅकमेल’
कमलाकरने बहिणीकरवी फोन करून ‘इमोशनल ब्लॅकमेल’ केले. सहा हजार पगारातून ५ हजार रुपये त्याला दिल्यानंतरही तो शेतीची मागणी करीत होता. आर्थिक कोंडीत पकडल्यानंतर तो जमीन विकण्यासाठी वारंवार दबाव टाकत होता. तसेच मुलांचा ताबा मागितल्यास घर बांधण्याचा तगादा लावत होता. महिन्याकाठी हजार रुपयांत भागत नव्हते. त्यामुळे काटा काढल्याचे विवेकने पोलिसांना सांगितले. 

विवेकने दाखवला ‘डेमो’
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नंदनवन पोलिसांनी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी विवेकला घटनास्थळी आराधनानगरात नेले. तेथे घरात कसा प्रवेश केला? कसा खून केला? बाहेर कसा आला? आणि पळून कसा गेला? या सर्व गोष्टींचा ‘डेमो’ विवेकने करून दाखवला. दुचाकीची किल्ली शोधली. परंतु, न सापडल्यामुळे पायी घरी चालत गेल्याचे त्याने कबूल केले. त्याने येण्यासाठी आणि जाण्यासाठी कोणत्या रस्त्याचा वापर केला? याचाही ‘डेमो’ पोलिसांनी घेतला. 

Web Title: pavankar murder case crime