विवेक करतोय पोलिसांची दिशाभूल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नंदनवन - जावई आणि बहिणीसह पाच जणांचा खून करणारा विवेक पालटकर पोलिसांची वारंवार दिशाभूल करीत असून एकच रडगाणे तो वारंवार गात असल्याची माहिती आहे. हत्याकांडाच्या घटनाक्रमाची रंगीत तालीम घेतानाही त्याने पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, विवेकच्या बोलण्यावर  पोलिसांचा विश्‍वास नसून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

विवेक पालटकरने स्वतःच्या मुलासह बहिणीचे कुटुंब नेस्तनाबूद केले. त्यानंतर तो रेल्वेने दिल्लीत पळून गेला. लुधियानातून गुन्हे शाखेने त्याला हुडकून काढले. 

सब्बलने एकच वार केला आणि जावई कमलाकर, भाची वेदांती आणि मुलगा कृष्णा या तिघांचाही मृत्यू झाला. त्यांचा आवाज ऐकून बहीण अर्चना उठली. त्यामुळे तिच्याही डोक्‍यात सब्बल घातली. तिचासुद्धा एकाच फटक्‍यात जीव गेला. 

सासू मीराबाई आवाजाने हॉलमधून बेडरूमकडे येताना दिसल्यानंतर त्यांच्याही डोक्‍यात सब्बल घालून मुडदा पाडला, असा घटनाक्रम विवेक सांगतोय. त्यामुळे पाच खून करेपर्यंत कुणालाही ओरडण्याचा आवाज येऊ नये, यावर पोलिसांचा विश्‍वास नाही.

Web Title: pavankar murder case vivek palatkar confuse police crime