पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

नागपूर : महापालिकेने शहरातील फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यास सुरुवात केली असून, आज अतिक्रमण विभागाने धरमपेठ व आशीनगर झोनमध्ये कारवाई केली. दोन्ही झोनमधील 102 अतिक्रमणे हटवून फुटपाथ मोकळे केले. दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. 

नागपूर : महापालिकेने शहरातील फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यास सुरुवात केली असून, आज अतिक्रमण विभागाने धरमपेठ व आशीनगर झोनमध्ये कारवाई केली. दोन्ही झोनमधील 102 अतिक्रमणे हटवून फुटपाथ मोकळे केले. दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. 
अतिक्रमण विभागाने आज दुपारी धरमपेठ झोनमध्ये भोले पेट्रोल पंपासमोरील रेल्वेच्या जागेवरील एका जाहिरात कंपनीचे बॅनर काढले. व्हीआयपी रोडवरील फळ विक्रेते, चायनीज, पाणीपुरी विक्रेत्यांचे हातठेले फुटपाथवरून हटविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व्हीसीए मैदान ते पाटोडीवाला, नाश्‍ता सेंटर, चहाटपरी यांचे अतिक्रमण हटवून एक ट्रक साहित्य जप्त केले. या भागात 37 अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली. आशीनगर झोनअंतर्गत कपिलनगर ते म्हाडा कॉलनी नारी रोडच्या बाजूचा फुटपाथ मोकळा करण्यात आला. या फुटपाथवरील फळ, चायनीज, चहाविक्रेत्यांना हटविण्यात आले. येथे स्थायी बांधकाम तोडण्यात आले. जरीपटका येथील रस्त्यावर दुकानदारांनी रस्त्यांवर ठेवलेले पुतळे जप्त केले. या कारवाईत 65 अतिक्रमणे हटवून 1 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात माळवे, मंथनवार, शादाब खान, विशाल ढोले यांनी कारवाई केली. या कारवाईमुळे दुकानदारांत खळबळ उडाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pavement for pedestrians