पवारांनी महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलवले

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः शरद पवार यांचा प्रचाराचा धडाका आणि सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याच्या संकल्पामुळे आज महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलले असून भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी अडचण येत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिवाळी मीलन कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपच्या दादागिरीच्या विरोधात पवारांनी आघाडी उघडली. वयाचा व तब्येतीचा विचार न करता त्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले. यामुळे आघाडीच्या आमदारांची संख्या वाढली. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी काही सभा व प्रचार दौरे केले असते तर आणखी फायदा झाला असता. विधानसभेच्या निकालावरून सत्ताधारी भाजपच्या विरोधात मोठा रोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आली आहे. विरोधक अधिक सक्षम झाला आहे. हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण आहे, असेही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.
प्रदेश सचिव दिलीप पनकुले यांनी शरद पवार यांच्या परिश्रमाने प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. त्यांनी प्रफुल्ल्ल पटेल यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मिठाई वाटून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. देवीदास घोडे, तात्यासाहेब मते, विक्रांत तांबे व सोपानराव शिरसाट प्रामुख्याने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com