कांदा हवाय, 20 रुपये अतिरिक्‍त भरा !

pay 20 rs. extra for onion
pay 20 rs. extra for onion

अमरावती : भाजीची फोडणी करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे कांदा. आता मात्र या कांद्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. घरच्या फोडणीत तर कांदा दुष्प्राप्य झाला आहेच, शिवाय हॉटेलमधल्या जेवणातून आणि नाश्‍त्यातूनही कांदा दिसेनासा झाला आहे. सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने आता पुन्हा एकदा नवीन वांदा करून ठेवलाय.

बाजारात आजवरचे सर्व रेकॉर्ड ब्रेककरणारा कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्‍यापलिकडे जाउन पोहचलाय. विशेष म्हणजे हॉटेल उपाहारगृहांमध्ये कांद्याचे साधे दर्शन घेण्यासाठी सुद्दा ग्राहकांना 20 रुपये अतिरिक्त भरावे लागत आहेत. त्यामुळे आता कांदा खरोखरच भाव खात असल्याचा प्रत्यय येवू लागला आहे. पावभाजी असो की छोले भटुरे, साधे पोहे असो की उपमा त्याबरोबर हॉटेलमध्ये बारीक चिरलेल्या कांद्याची प्लेट न मागताच येत होती. आता मात्र कांद्याची रहिसी हवी असेल तर ग्राहकांच्या खिशातून आणखी 20 रुपये जाणार आहेत. एवढासा गडू त्याला पाहून रडू ही म्हण कांद्याने खरी करून दाखवली असे म्हणायला हरकत नाही. कांद्याच्या चढ्या भावांनी झुनका भाकर वाला गरीबांचा कांदा एकदमच हाय प्रोफाईल झाला आहे.

ग्रीन सलाद 50 रुपये

हॉटेल्समध्ये गेल्यानंतर साधा सलाद बोलाविल्यास त्यामध्ये कांदा, निंबू दिले जाते. ग्रीन सलाद घेतल्यास त्यामध्ये गाजर, काकडी, बीट, पत्ता कोबी, कांदा लिंबू दिल्या जाते. दरम्यान, साधा सलाद हा बहूतांश हॉटेल्समध्ये कॉम्प्लिमेटरी दिल्या जातो. मात्र कांदा भाव खायला लागल्याने साधा सलादही हॉटेल्समधून गायब झाला आहे.

शंभर रुपये किलो कांदा

आमच्या हॉटेलमध्ये बारिक कांदा येत नाही. शंभर रुपये किलो रुपयाने कांदा खरेदी केला जातो. 15 दिवसापूर्वी आम्हीच ग्राहकांना मोफत कांदा दिला. मात्र सध्या कांद्याचे दर वाढल्याने ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेत आहे, असे मत हॉटेल चालकांनी व्यक्त केले.

कांद्यावरून ट्रोल

कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्‍याबाहेर गेल्याने सोशल मीडियावर कांद्यावरून ट्रोल केल्या जात आहे. सोन्याच्या रिंगमध्ये डायमंडच्या जागी कांदा लावून शेअर केल्या जात आहे. तिजोरीत पैशांऐवजी कांदा ठेवावा, असेही विनोद काही लोक करीत आहेत. याशिवाय कांद्यावरून अनेक विनोद सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. कांद्यामुळे घरावर दरोडा अशा बातम्याही काही दिवसात ऐकायला मिळाल्या तर नवल नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com