...तर मंत्रिपद सोडेन - आठवले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

नागपूर - रेशीमबागेतील कवी सुरेश भट सभागृहात आंतरराष्ट्रीय शांती आणि समता परिषदेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाषण करण्यासाठी उभे होताच प्रेक्षागृहातून संजय जीवने यांनी भाजप-संघाच्या विचारांतून होत शांती परिषदेचा धिक्कार करीत घोषणा दिली. त्यावेळी आठवले यांनी आपल्या खास शैलीत गडबड करण्यासाठी दोन लोकांनाच का घेऊन आलात रे? असा सवाल करीत पाचपन्नास विरोधक असावे लागतात.

नागपूर - रेशीमबागेतील कवी सुरेश भट सभागृहात आंतरराष्ट्रीय शांती आणि समता परिषदेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाषण करण्यासाठी उभे होताच प्रेक्षागृहातून संजय जीवने यांनी भाजप-संघाच्या विचारांतून होत शांती परिषदेचा धिक्कार करीत घोषणा दिली. त्यावेळी आठवले यांनी आपल्या खास शैलीत गडबड करण्यासाठी दोन लोकांनाच का घेऊन आलात रे? असा सवाल करीत पाचपन्नास विरोधक असावे लागतात. जिंदाबाद, मुर्दाबादच्या घोषणात देत इथपर्यंत पोहचल्याचे सांगत मला काळे झेंडे दाखवण्यापेक्षा निळे झेंडे दाखवा असा टोला लगावला आणि शांती परिषदेच्या निमित्ताने उपस्थितांसमोर आठवले यांनी संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी मंत्रिपद सोडणार अशी ग्वाही दिली. सोबतच संविधान बदलण्याचे कारस्थान करणाऱ्यांचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही यावेळी आठवले यांनी बोलून दाखवला.

सध्या अस्वस्थ वर्तमान दिसत आहे. परंतु ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात येणार नाही, असे सांगतानाच पदोन्नतीतील आरक्षणाचाही प्रश्‍न सुटेल, असा विश्‍वास आठवले यांनी व्यक्त केला. सभागृहाबाहेर समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी काही वेळ गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परिषदेत आयोजकांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. परंतु पोलिसांनी विरोधकांचा बेत हाणून पाडला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत सोडण्यात आले नसल्याची माहिती आहे.

भन्ते ज्ञानज्योतींनी केला निषेध 
आभार प्रदर्शन सुरू असताना भन्ते ज्ञानज्योती यांनी ध्वनिक्षेपक घेऊन आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. विशेष असे की, परिषदेत धम्मपीठावर बसून होते. मात्र काही कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा मंचावर नेले.

Web Title: Peace Council in nagpur