पीकविम्याची भरपाई शेतकऱ्यांना द्या : दिवाकर रावते

file photo
file photo

अमरावती : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची यादी तयार करून तसेच विमा कंपन्यांना बोलावून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ मिळवून देण्यात यावा, असे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज, शनिवारी येथे दिले.
रावते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा विभागीय आढावा घेतला. जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे (बुलडाणा), आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे, आमदार संजय रायमुलवार (मेहकर), आमदार शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा) यांच्यासह सहसंपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, राजेश वानखडे, श्‍याम देशमुख (अमरावती), श्रीरंग पिंजरकर (अकोला), नगरसेवक दिनेश बूब, सोमेश्‍वर पुसदकर आदी मंडळी या प्रसंगी उपस्थित होती. विम्याच्या भरपाईची रक्कम उपलब्ध असताना वरुड, मोर्शी तालुक्‍यात 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला जातो. त्याचवेळी दुष्काळग्रस्त अंजनगावसुर्जी तालुक्‍यात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. हा भेदभाव का, असा प्रश्‍न बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. गावपातळीवर कृषी सहायक कोण आहे? अधिकारी कोण आहे? सर्वेक्षण जबाबदारीने केले जात नाही, सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर केला जात नाही, असे आक्षेप बैठकीत नोंदविण्यात आले.
प्रधानमंत्री पीकविमा योजना पूर्णतः शासकीय आहे. शेतकरी हिस्सा घेऊन हफ्त्याची उर्वरित रक्कम सरकारतर्फे अदा केली जाते. अशा परिस्थितीत विम्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. त्यासाठी शिबिर घेण्यात यावे. शिवसेनेच्या भूमिकेनंतर विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यासंदर्भात शिवसेना पदाधिकारी 15 ऑगस्टच्या सभेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. कृषी विभागाने तालुकास्तरावर मदत केंद्र गठित करावे, मंत्री व पक्षाचे नेते शेतकरी प्रश्‍नांचा आढावा घेतील, असे रावते म्हणाले.
बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, पाचही जिल्ह्यांतील जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com