पेंचमधील वन्यप्राण्यांना टॅंकरचा आधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

कमी पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका पेंच व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांना बसू लागला आहे. त्यामुळेच या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाने युद्धपातळीवर पाण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी सात वनपरिक्षेत्रांतील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांवर टॅंकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

नागपूर - कमी पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका पेंच व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांना बसू लागला आहे. त्यामुळेच या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाने युद्धपातळीवर पाण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी सात वनपरिक्षेत्रांतील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांवर टॅंकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प 257 चौरस किमीच्या विस्तीर्ण परिसरात व्यापलेला आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील तोतलाडोह येथे मोठे धरण आहे. या धरणातील पाण्याचा साठा फक्त तीन ते साडेतीन टक्‍क्‍यांवर आला आहे. हे धरण नागपूरची रक्तवाहिनी आहे. या धरणात पाणी नसल्याने नागपूरकरांवर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे सावट असून, आता जंगलातील वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच पेंच प्रकल्पातील पाणवठ्यांवर टॅंकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

Web Title: Pench Tiger Project Wild Animal Water Tanker