वणा नदी संवर्धनासाठी एकवटला जनसागर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

हिंगणघाट (जि. वर्धा) : हिंगणघाट तसेच जवळपासच्या अनेक गावांची जीवनदायिनी असलेल्या वणा नदीचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. या नदीच्या संवर्धनाकरिता समिती गठित करून नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या अंतर्गत बुधवारी (ता. 25) शहरातून मोर्चा काढून वणा तीरावर नेण्यात आला. याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

शहरातील सांडपाणी, अवैध रेती उपसा, वृक्षतोड, नदीत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे थांबलेला प्रवाह, नदीत वाढलेली अनावश्‍यक वनस्पती अशा अनेक समस्यांनी वणा नदीला वेढलेले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वणा नदीचे शोषण होत आहे. हे थांबविण्यासाठी शहरातील डॉ. आंबेडकर चौकातून निघालेल्या रॅलीत शहरातील विविध 40 सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, व्यापारी, किराणा, कपडा, मेडिकल, डॉक्‍टर असोसिएशन एकदिलाने सहभागी झाले. मोहता चौक, टिळक चौक असा मार्गक्रमण करीत गाडगेबाबा यात्रेच्या ठिकाणी नदी पात्रावर रॅली थांबली. सर्वप्रथम विद्यार्थी व उपस्थितांनी "मी नदी अस्वच्छ करणार नाही व तिचे पावित्र्य जपेल' अशी जलप्रतिज्ञा घेतली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People came together to conserve Vana river