सहन करतोय जी पावसाने दिलेल्या यातना

केवल जीवनतारे
रविवार, 8 जुलै 2018

‘‘घरात थोडथोडक पीठ व किलो-दोन किलो तांदुळ होते. सारे वाहून गेले. तिखटामिठाचे अन्‌ हळदीचे डबेही गेले. भांड्यासह मुसळधार पाऊस आमच्या संसारांचे सारेच घेऊन गेला. झोपड्यातील दोनचार गोधड्या, कपडे ओलेचिंब झाल्याने झोपडीच्या फाट्याला लटकून होते. पावसाने दिलेल्या यातना सहन करतो जी अशा भावना रतिमाने व्यक्त केल्‍या.

‘‘घरात थोडथोडक पीठ व किलो-दोन किलो तांदुळ होते. सारे वाहून गेले. तिखटामिठाचे अन्‌ हळदीचे डबेही गेले. भांड्यासह मुसळधार पाऊस आमच्या संसारांचे सारेच घेऊन गेला. झोपड्यातील दोनचार गोधड्या, कपडे ओलेचिंब झाल्याने झोपडीच्या फाट्याला लटकून होते. पावसाने दिलेल्या यातना सहन करतो जी अशा भावना रतिमाने व्यक्त केल्‍या.

शनिवारी दिवसभर ती झोपडीतील मुसळधार पावसाने फाटलेली लक्तरे समोरच वाळवत होती. मात्र, चिल्यापिल्यांना खाऊ घालण्यासाठी वाहून गेलेला संसार पुन्हा तीन विटांवर याच आईने सायंकाळच्या समयी सजविला. साईनगरातील पाण्याच्या टाकीजवळ सुमारे पाच झोपड्यांमध्ये पंधरा ते वीस लोकांचा संसार सुरू आहे. सारी स्थानांतरित कुटुंबे. रोजीरोटीच्या शोधात आले. 

ज्या कंत्राटदारांकडे हे मजूर काम करतात त्यांच्या शेजारीच यांचा संसार फुलतो. ऊन वारा पावसाचा मारा झेलत जगणं हेच त्यांचे आयुष्य. शुक्रवारीही तेच झाले. रात्रभर मुसळधार पावसाच्या बरसत्या धारांचा मारा सहन करीत रात्र काढल्याच्या भावना मनिरामने व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी रोजीरोटी सोडून पावसाने विस्कटलेला संसार उभे करण्यासाठी दिवसभर घरीच असल्याचे संतोषराव, नीतम, सत्यजित म्हणाले.’’ 

रात्रभर पाण्याच्या टाकीचा आधार
गुरुवारी रात्री ९ वाजता पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. ताटात जेवण घेऊन साऱ्यांनी पाण्यापासून बचावासाठी टाकीच्या खाली आधार घेतला. तेथेच जेवण केले. जेवण झाले, परंतु प्यायला पाणी नाही. झोपडीतील सारेच वाहून गेले. रात्रभर पाण्याशिवाय राहावे लागले. पाण्याच्या टाकीखालीच रात्र काढावी लागली असे बिरजू म्हणाला. समस्यांशी झुंजत-झुंजत आयुष्य जगताना जागा मिळेल तिथे बिऱ्हाड हलवणारे हे कुटुंब दोन वर्षांपासून येथे आहेत. सारे स्थलांतरीत मजूर असल्याने ना त्यांचे आधार कार्ड ना रहिवासी दाखला. यामुळे मदत मिळणार नाही, हे त्यांनीच सांगून टाकले. 

वाहून गेले झोपड्यांचे सौंदर्य
दोन दिवसांपूर्वीची घटना. कथाकार दादाकांत धनविजय यांच्या ‘गुलसिता’ या शॉर्ट फिल्मचे शूटिंग याच झोपड्यांमध्ये झाले. झोपडीतील दुःखाचा संसार कसा असतो, दुःखाशी संघर्ष करताना आक्रोशासोबतच एका विचारधारेतून ‘सोल्यूशन’ मिळवणारी मुलंही या शॉर्ट फिल्ममधून दाखवली आहेत. या झोपड्यांचे सौंदर्य ‘गुलसिता’तून दिसत असतानाच महापुराने झोपड्यांचे सौंदर्य वाहून गेले. आता येथील भकास वातावरण बघताना गुलसिताच्या या टीमकडून यांना मदत केली जाणार असल्याचे शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक सुबोध नागदिवे म्हणाले.

Web Title: People feeling after rain

टॅग्स