मातृतीर्थावर उसळणार आज जनसागर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

सिंदखेडराजा : महाराष्ट्रासह देशभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी सिंदखेडराजा येथे हजारो जिजाऊ भक्‍तांची गर्दी आज (ता. 12) उसळणार आहे. जिजाऊसृष्टीवर तसेच राजवाडा परिसरात हा सोहळा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दरवर्षी 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यावर व मराठा सेवा संघ तयार करीत असलेल्या जिजाऊसृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा होतो. गुरुवारी (ता. 12) सकाळी सात वाजता सिंदखेडराजा नगरपालिका, जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधींच्या वतीने राजवाड्यावरील जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.

राजवाड्यावरील सोहळ्यानंतर जिजाऊ सृष्टीवर दिवसभर सांस्कृतिक, बौद्धिक व सामाजिक कार्यक्रम सुरू राहतील.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. जिजाऊ सृष्टीवरील कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रासह हरियाना, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यामधूनही जिजाऊ भक्‍त या ठिकाणी येणार आहेत. शिवधर्मपीठावर सायंकाळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह राज्यभरातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

Web Title: people rush to sindhkhedraja for jijau birth anniversary